1. बातम्या

शेतीतील नवी कमाई : वाळलेल्या फुलांमधून मिळेल पैसा

KJ Staff
KJ Staff


अनेक शेतकरी आपल्या शेतीत नव- नवीन प्रयोग करत असतात. या प्रयोगात फुलांची शेतीदेखील काही शेतकरी करत असतात. परंतु बऱ्याच वेळेस फुलांना योग्य बाजारभाव नाही मिळाला तर शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागते.  बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना उभ्या फुलांच्या शेतात नांगर फिरवावा लागतो. सध्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यावेळी अनेक फुलांची शेती करणारे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. आज या लेखात आपण फुलांच्या शेतीविषयी माहिती घेणार आहोत. फुले ताजी असली तरच जोरदार भाव मिळतो, मोठी मागणी असते पण तुम्हाला माहिती आहे का वाळलेल्या फुलांपासूनही तुम्ही उत्पन्न मिळू शकता असं नाही ना आज आपण त्याच विषयी माहिती घेणार आहोत.

आंतरराष्ट्रीय आणि भारतीय दोन्ही बाजारांत सुक्या फुलांना फार मागणी आहे. भारतामधून ही फुले यूएसए, जापान आणि यूरोपला निर्यात केली जातात. भारतामध्ये फुलांचे विविध प्रकार असल्यामुळे या व्यापारात तो प्रथम स्थानी आहे. नुसतीच सुकी फुले नाही तर त्यांचे देठ, सुकलेले कोंब, बिया, देठांची साले इत्यादींची देखील निर्यात होते.

भारतातून अशी निर्यात सुमारे रू.१००कोटींची होते. या उद्योगातून २० देशात ५०० प्रकारच्या फुलांचे प्रकार पाठवले जातात. यापासून हातकागद, लँपशेड, कँडल होल्डर, जूटच्या पिशव्या, फोटो फ्रेम, बॉक्स, पुस्तके, वॉल हँगिग, टॉपियरी, कार्डे आणि कितीतरी वस्तू बनल्या जातात.  या वस्तूंसाठी सुक्या फुलांचा उपयोग केल्यामुळे त्यांची शोभा आणखी वाढते आणि त्या वस्तू छान दिसतात.

सुकी फुले बनविण्याची पध्दत

वाळविणे

डाय करणे

वाळविणे -

-फुले खुडण्यासाठी आणि वाळविण्यासाठी उत्तम काळ:

फुले सकाळच्या वेळी जेव्हा त्यांच्यावरील दव उडून जातात

तेव्हा खुडावीत. एकदा खुडल्यावर, देठ एकत्र करून त्यांना रबर बँडने बांधा आणि शक्यतो लवकर उन्हातून बाजूला करा.

उन्हात वाळवणे :

उन्हात वाळविणे हा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. पण पावसाळ्यात हे शक्य नसते.फुलांचे गुच्छ दोरीने बांधून बांबूच्या काड्यांनी लोंबते ठेवा. यात रसायनांचा वापर करीत नसतात. चांगले वायुवीजन मात्र हवे. या पध्दतीत बुरशी लागण्याचा फार धोका असतो.


व्यावसायिक सुक्या फुलांचे उत्पादन

-फुले व वनस्‍पतींचे भाग

कोंबड्याचा तुरा, जाई, अमरांथस, ऍरेका आणि नारळाची पाने आणि खुडलेली फुले या वर्गात येतात. सुकी पाने व कोंबदेखील वापरतात. गेल्‍या 20 वर्षांपासून भारत या प्रकारची निर्यात करीत आहे. भारताचा मुख्य ग्राहक इंग्लंड देश आहे.

 

-पॉटपाउरी

हे सुगंधी सैल अशा सुक्‍या फुलांचे मिश्रण आहे जे एका पॉलिथिनच्‍या पिशवीत ठेवतात.

सामान्‍यपणे कपाटात, ड्रॉवरमध्‍ये किंवा बाथरूममध्‍ये ठेवतात.

या पध्‍दतीत 300 पेक्षा जास्‍त प्रकारच्‍या फुलांचा समावेश आहे.

बॅचलर्स बटन, कोंबड्याचा तुरा, जाई, गुलाबाच्‍या पाकळ्या, बोगनविलियाची फुले, कडुलिंबाची पाने, आणि फळांच्‍या बिया इत्यादी उपयोग भारतात पॉटपाउरीसाठी करतात. 

-सुक्‍या फुलाचा पॉट

सुके देठ आणि कोंब वापरतात,याची मागणी कमी असली तरी उच्‍च उत्पन्न वर्गातून याचा वापर आहे व पैसेही जास्‍त मिळतात. साधारणपणे वापरात येणारे पदार्थ आहेत,कापसाच्‍या वाळलेल्‍या बिया, पाइनची फुले, सुक्‍या मिरच्‍या, सुका दुधी भोपळा, गवत, जाईचे रोपटे, एव्‍हरलास्टींग फुले, अस्‍पॅरॅगसची पाने, फर्नची पाने, झाडांच्‍या साली आणि तुरे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters