नेटाफीमने आणली नाविन्यपूर्ण डिजिटल सिंचनप्रणाली

Saturday, 15 December 2018 08:57 AM


भारतीय शेतकऱ्यांसाठी ‘नेटबीट’ हे उत्तम आणि नवीन असे तंत्रज्ञान बनवण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान बनवणारी नेटाफीम ही इस्त्राईलची कंपनी असून नेटबीट हे जगातील पहिले आणि सर्वात अत्याधुनिक डिजिटल सिंचन प्रणाली आहे. नेटबीटचे भारतात औपचारीकरित्या लॉन्च करण्यात आले असून यावेळी नेटाफीमचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक रणधीर चौहान, इस्त्राईलचे संचालक लायोर डोरोन, व्यवसाय विकास विभागाचे प्रमुख इझर गिलाड उपस्थित होते. नेटाफीम या कंपनीने 50 वर्षापूर्वी ठिबक सिंचन प्रणालीची सुरवात करून एक नवीन क्रांती केली होती. याच प्रकारे आता ‘नेटबीट’ ही डिजिटल सिंचन प्रणाली विकसित करून पुन्हा एकदा कृषी क्षेत्रात क्रांती करत आहे.  

शेतजमिन आणि बाहेरील पिके, माती, हवामानाची स्थिती यांच्याशी संबंधित डेटावर सद्य स्थितीला साजेशा असलेल्या शिफारशी देण्याचे काम नेटबीटद्वारे केले जाते. कृषीशास्त्र आणि जलविद्युतशास्त्र या विषयात नेटाफीमला विशेष अनुभव असून कंपनी मागील 50 वर्षांपासून या विषयात संशोधन करत आहे. नेटबीट ही भारतीय शेतकऱ्यांसाठी असलेली अतिशय उत्तम आणि कल्पक अशी पहिलीच मेंदूप्रमाणे काम करणारी सिंचनप्रणाली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना शेतीकडे लक्ष देणे, तपासणी करणे आणि कुठेही असले तरी स्मार्टफोनच्या साह्याने हे तंत्रज्ञान वापरणे सहज शक्य होणार आहे. सिंचनाचे काम सोपे व्हावे यासाठी ही सिंचन प्रणाली प्रामुख्याने बनवण्यात आली आहे.

नेटबीट हे इस्त्राईल टेक्नोलॉजी वर आधारित असून याचे निर्माण एमप्रेस्ट या कंपनीच्या सहकार्याने करण्यात आले आहे. नेटबीटमुळे शेतकऱ्याला विविध पिकांच्या नमुन्यांचा रियल टाईम डेटा मिळू शकतो, त्यामुळे पाण्याचा आणि इतर स्त्रोतांचा कमीत कमी वापर करुन नेटबीट ही सिंचन प्रणाली शेतकऱ्याला स्वत:ला वापरता येणार आहे. सर्व स्तरातील शेतकऱ्यांना समोर ठेऊन, ही प्रणाली त्यांना वापरण्यासाठी सोपी व्हावी व जास्तीत जास्त फायदे मिळावे यादृष्टीने त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना रणधीर चौहान म्हणाले, “नेटफीम ही अतिशय नाविन्यपूर्ण अशी कंपनी असून ती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी स्त्रोतांचा वापर करुन जास्त पिक उत्पादन करण्यासाठी जगभरात मदत करते. नेटबीटद्वारे लहान आणि मोठ्या शेतकऱ्यांना डिजिटल सिंचन आणि कमीत कमी स्त्रोतांमध्ये जास्त उत्पन्न देण्यासाठी टिकाऊ आणि नाविन्यपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम कंपनीद्वारे केले जाते.

लायोर डोरोन म्हणाले, “नेटबीट ही स्वतःची बुद्धी असणारी पहिली सिंचन व्यवस्थापन प्रणाली आहे. यामध्ये सिंचन, खतपाण्यावर नियंत्रण ठेवणे आणि इतर व्यवस्था हे Smart DSS Crop Model सोबत सगळे एकत्रितपणे शक्य होते. कोणत्याही वेळेला आणि कुठलाही हवामान अंदाज, इतर सुविधा आणि शेतीचा दूरवरच्या ढगांशी असणारा संबंध यामुळे समजतो.”

सध्याची अन्न व पाणी यांच्या सुरक्षेची आव्हाने पाहता मौल्यवान संसाधनांची कमतरता, पाण्याचा अकार्यक्षम वापर यामध्ये नेटफीमच्या नेटबीट या पहिल्याच स्वतःची बुद्धी असलेल्या प्रणालीचा आम्हाला अभिमान आहे” असे इझर गिलाड म्हणाले.

NetBeat netafim नेटबीट नेटाफीम Israel इस्राईल drip irrigation ठिबक सिंचन
English Summary: Netafim introduced innovative digital irrigation system

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.