सर्वांचे लक्ष लागलेल्या शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी गटाने 19-1 अशा फरकाने विजय मिळवीत सत्ता प्रस्थापित केली आहे. विरोधी किसान क्रांती पॅनेलचे दादा पाटील फराटे हे एकमेव उमेदवार विजयी झाले. घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.
विरोधकांनी जोरदार तयारी केली होती, मात्र केवळ किसान क्रांती पॅनलचे पॅनल प्रमुख दादापाटील फराटे यांचा निसटत्या 155 मताने विजय झाला आहेत. रविवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सोमवारी न्हावरे फाटा येथील कानिफनाथ मंगल कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सकाळपासून कार्यकर्त्यांनी मतमोजणीसाठी प्रचंड गर्दी केली होती.
राष्ट्रवादीची एक जागा आधीच बिनविरोध झाली आहे. सहा फेर्यांमध्ये केलेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीने आघाडी घेत 19 जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादीचे 20 उमेदवार संचालक झाले आहेत, तर विरोधी किसान क्रांती पॅनेलचे प्रमुख यांनी चांगली लढत देत विजय मिळविला. काही ठिकाणी मतमोजणी सुरू असताना दोन्ही पॅनेलमध्ये चुरस झाल्याचे दिसून आले.
मोदी सरकारची 60 लाख टन साखर निर्यातीस परवानगी
दरम्यान, मताला नाही पण उसाला भाव देणार, असा नारा देणार्या किसान क्रांती पॅनेलने कडवी झुंज देत लढविलेली निवडणूक तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान, 25 वर्षे एकहाती सत्ता असलेले आमदार अशोक पवार यांच्याविरोधात माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे तसेच सर्वपक्षीय नेते एकवटले होते.
सर्वपक्षीय मिळून किसान ‘क्रांती पॅनेल विरुद्ध शेतकरी पॅनेल’ अशी समोरासमोर लढत होती. निवडणुकीदरम्यान माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे निधन झाल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. असे असले तरी विरोधकांनी देखील चांगली लढती दिली, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
महत्वाच्या बातम्या;
ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्याच्या संचालकांवर गुन्हा दाखल
ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एका वाहतूकदाराचा खून
राज्यात होणार नव्याने स्वयंचलित हवामान केंद्रे, हवामानाची मिळणार अचूक माहिती...
Share your comments