
Kalyanrao Kale sharad pawar
कारखान्याबाबत सध्या अनेक ठिकाणी चौकशा सुरु आहेत. असे असताना आता पंढरपूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) अडचणीत सापडले आहेत. आता त्यांना सीताराम महाराज साखर कारखान्यासाठी गोळा केलेले सभासदांचे भाग भांडवल व्याजासह परत देण्याचे आदेश सेबी ने दिले आहे.
यामुळे आता चर्चा सुरु आहे. कल्याण काळे हे पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सीताराम साखर कारखान्याच्या शेअर्सपोटी 17 कोटी रुपयांची रक्कम गोळा केली होती. यानंतर अनेकांनी याबाबत तक्रारी देखील केल्या होत्या. काळेंनी सीताराम साखर कारखाना काळेंनी विकला होता.
सभासदांकडून गोळा केलेली रक्कम व्याजासह परत करण्याबाबत दीपक पवार यांनी सेबीकडे तक्रार केली होती. यामुळे पैसे मिळणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाने व्याजासह एकूण 41 कोटी रुपयांची रक्कम जवळपास पाच हजार सभासदांना पाच जानेवारी पूर्वी परत देण्याचे आदेश सेबीने दिले आहेत.
अखेर राज्यपालांच्या हकालपट्टीचा मुहूर्त ठरला? शिवछत्रपतींचा अवमान केल्यामुळे होणार कारवाई
या घटनेमुळं पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पाच हजार लोकांचे 17 कोटी रुपयांचे मुद्दल होते. तसेच त्यावरील व्याज असे मिळून 41 कोटी रुपये रक्कम 5 जानेवारी 2023 पर्यंत देण्याचे आदेश सेबीने दिले असल्याची माहिती दिपक पवार यांनी दिली. यामुळे याची चर्चा पंढरपुरात सुरु आहे. कल्याणराव काळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी 2009-10 साली सीताराम महाराज साखर कारखाना खर्डी लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली.
कारखाना उभा करत असताना कल्याणराव काळेंनी हजारो लोकांकडून शेअर्सपोटी कोट्यवधी रुपये घेतले होते. मात्र, गेल्या दोन वर्षापूर्वी कल्याणराव काळे यांनी तो साखर कारखाना, ती कंपनी शिवाजीराव काळुंगे यांना विकली. गेली 10 वर्ष लोकांचे पैसे अडकून पडले आहेत. लोकांनी वारंवार मागणी करुनही शिवाजीराव काळुंगे गुंतवणुकदारांचे पैसे परत देत नव्हते.
Sugarcane FRP: ‘किसन वीर’ कारखान्याची २५०० पहिली उचल
गेल्या वर्षभरापासून सेबीकडे तक्रारी केल्या होत्या. अखेर आता शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, या निर्णयामुळे तालुक्यातील राजकारणाला एक वेगळा मार्ग मिळणार आहे. यामुळे पुढील काळात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा जिल्हा प्रशिक्षण अभ्यास वर्ग संपन्न
बारामतीकरांनो आता वेगावर ठेवा मर्यादा! स्पीडगन ठेवणार तुमच्यावर लक्ष, दोन हजारांपर्यंत दंड
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी अर्ज करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Share your comments