राज्य शासन प्रत्येक महाविद्यालयात अनुदानित राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम राबविणार :- रासेयो राज्य संपर्क अधिकारी प्रशांत वणंजे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यापीठ सल्लागार समितीची सभा संपन्न!कृषीप्रधान संस्कृती लाभलेल्या आपल्या देशात आजही बहुतांश जनता प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कृषी व तत्सम व्यवसायांवरच अवलंबून असून देशाचे अर्थचक्र गतिमान राखण्यात ग्रामीण भागाचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख
कृषी विद्यापीठ, अकोला चे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.Vice-Chancellor of Agricultural University, Akola Dr. By Sharad Gadakh. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यापीठ सल्लागार समितीच्या सभेप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शेतकरी बांधवांना कमी खर्चात जास्त उत्पादन, शेतकऱ्यांना "मल्टिप्लायर तंत्रज्ञान वरदान"
गाव खेड्यांच्या विकासानेच राष्ट्राचा विकास साध्य होणार असून आदर्श गाव निर्मितीसाठी गावातील शैक्षणिक संस्था ग्रामपंचायत व पतसंस्था या तीन संस्थाची महत्वाची भूमिका निर्णायक असल्याचे सांगतानाच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून चांगला नागरिक पर्यायाने चांगले गाव व देश
घडविण्यासाठी एकात्मिक प्रयत्नांची गरज अनुभवी मार्गदर्शनात अधोरेखित केली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून "मॉडेल विलेज" निर्मितीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तत्पर असून कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे माध्यमातून प्रगत कृषी तंत्रज्ञान गावोगावी पोहोचण्यात मदतच होत असल्याचे डॉ. गडाख यांनी याप्रसंगी सांगितले. प्रत्येक महाविद्यालयाला राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट दिल्याबद्दल राज्य शासनाचे विशेष आभार व्यक्त करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यापीठ समन्वयकांसह सर्वच कार्यक्रम अधिकारी व
स्वयंसेवकांचे राज्य पातळीवरील उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन केले. तर प्रत्येक महाविद्यालयाला अनुदानित राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट देण्यात येत असून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राज्य पातळीवर उत्कृष्ट कार्य करीत एक आदर्श घालून दिल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉक्टर प्रशांत कुमार वनजे यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. विद्यापीठातील स्वयंसेवकांनी सर्वोत्तम कार्य करीत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध सन्मान प्राप्त केल्याचे सांगताना आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत
सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन विद्यापीठाद्वारे केल्यास राज्य शासन सर्वतोपरी सहाय्य करेल असा विश्वास व्यक्त केला व उपस्थित रासयो कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या शंकांचे समाधान केले. शेतकरी सदनाच्या कृषी जागर सभागृहात आयोजित या सभेच्या प्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई यांची व्यासपीठावर तर सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय, अकोला डॉ. प्रकाश नागरे, सहयोगी अधिष्ठाता वनविद्या महाविद्यालय अकोला,
डॉ. शैलेश हरणे, सहयोगी अधिष्ठाता कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ डॉ. नरसिंग पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ डॉ. विजय माने, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठ समन्वयक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांचे सह विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्वच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांची सभागृहात उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना गीताने सुरु झालेल्या या सभेच्या सुरुवातीला
विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे यांनी प्रास्ताविक सादर केले. तर रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.अनिल खाडे(अकोला ), प्रा. दीपक पाडेकर (अमरावती ), प्रा.टी. एस राठोड (जळगाव जामोद), प्रा. राणी काळे (वर्धा ), सौ. स्वाती देशमुख (बोधना ), आदींनी आपले मनोगता द्वारे महाविद्यालयाद्वारे राबविण्यात आलेले विविध उपक्रम व राज्य शासन तथा विद्यापीठ प्रशासनाकडून विविध अपेक्षा व्यक्त केल्या. अधिष्ठाता कृषी डॉ. श्यामसुंदर माने यांनी विद्यापीठाला अपेक्षित ग्रामविकासाचे कार्य साधण्यासाठी कार्यक्रम
अधिकारी तथा स्वयंसेवकांनी करावयाच्या उपायोजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी उन्नत भारत अभियानाचे विद्यापीठ समन्वयक डॉ. किशोर बिडवे यांनी "एकात्मिक प्रयत्नातून शाश्वत ग्रामविकासाचे डॉ. पंदेकृवी मॉडेल विस्ताराने सादर केले व कुलगुरू महोदयांचे संकल्पनेतील "आदर्श ग्राम" निर्मितीसाठी संपूर्ण नियोजन तथा कृती आराखडा तयार असल्याचे सांगतानाच प्रत्येक महाविद्यालयाचे परीक्षेत्रात किमान एक गाव "मॉडेल
व्हिलेज" म्हणून निर्माण करण्यासाठी विद्यापीठाच्या प्रयत्नांना सर्वांनीच साथ द्यावी असे आवाहन केले. सभेचे सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रा. रोहित तांबे यांनी केले तर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे यांचे मार्गदर्शनात विद्यार्थी कल्याण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.
Share your comments