1. बातम्या

National Horticulture Board Recruitment 2020 : सिनीअर हॉर्टिकल्चर ऑफिसर, चिफ ऑपरेटिंग ऑफिसर पदासाठी भरती

कृषी आणि फलोत्पादन (हॉर्टिकल्चर) संलग्न क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांना चांगली संधी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाने मिळवून दिली आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाने वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


कृषी आणि फलोत्पादन (हॉर्टिकल्चर) संलग्न क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांना चांगली संधी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाने मिळवून दिली आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाने वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील पदांसाठीची शैक्षणिक अर्हता पहावी आणि अर्ज करावेत.

National Horticulture Board Recruitment 2020: रिक्त पदांची माहिती

पदाचे नाव - वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी

कालावधी - पूर्णवेळ

पदसंख्या - ७

शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याच्या अधिक माहितीसाठी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्या www.nhb.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

पे स्केल - ९३००- ३४८०० + ग्रेड पे ४२००/-

वयोमर्यादा -  ५६  years.

अर्ज करण्याची अंतिम मुदत – २७ ऑक्टोबर २०२०

पदाचे नाव - मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ)

कालावधी - पूर्णवेळ

पदसंख्या - १

शैक्षणिक पात्रता - उमेदवाराकडे कृषी/फलोत्पादन विषयातील पदवी किंवा पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट/ कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ अॅग्री लॉजिस्टिक वा इंजिनीअरिंग/व्यवस्थापन या विषयातील शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा आयआयएम, आयआयटी, आयआयएफएम, आयआरएमए अशा संस्थांतील पदवी असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

पे स्केल – ९३०० -३४८०० + ग्रेड पे ४२००/-

वयोमर्यादा - उमेदवाराचे वय  १६ मे २०२० या अर्हता दिनांकापर्यंत  ५० वर्षांपेक्षा कमी असावे.

वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी पदासाठी जाहीरात प्रसिद्ध झाल्पासून ४५ दिवसांमध्ये अर्ज नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्या कार्यकारी संचालकांकडे पोहोचणे आवश्यक आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्जाचा नमुना बोर्डाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांना अधिक पतशीलासाठी एम्प्लॉयमेंच न्यूज दि. १२ – १८ सप्टेंबर येथेही माहिती मिळेल. मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवारांनी  “Application-NCCD” अशा उल्लेखासह आपले पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता याच्या माहितीसह परिपूर्ण अर्ज सिलबंद लिफाफ्यातून पाठवावे.  अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.

हेही वाचा : देशातल्या पाच बँकांमध्ये मोठी भरती; त्वरीत करा ऑनलाईन अर्ज

अर्ज पाठविण्याचा पत्ता -

The Managing Director,

National Horticulture Board,

85, Institutional Area, Sector-18,

Gurugram – 122015, Haryana

English Summary: National Horticulture Board Recruitment 2020 : Recruitment for the post of Senior Horticulture Officer, Chief Operating Officer Published on: 15 September 2020, 05:59 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters