1. बातम्या

देशातल्या पाच बँकांमध्ये मोठी भरती; त्वरीत करा ऑनलाईन अर्ज

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयबीपीएस लिपिक माध्यमातून  १५५८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन(आयबीपीएस)ने युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि इतर बँकांमध्ये लिपिक मोठ्या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केल्या आहेत . (सीआरपी लिपिक-एक्स 2021-22)च्या माध्यमातून यावर्षी एकूण १५५८  पदांसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस(सीआरपी)साठी उमेदवारांची निवडले जाणार आहेत.

 या पदांसाठी ऑनलाईन नोंदणी २ सप्टेंबर २०२०  पासून सुरू करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना आयबीपीएस लिपिक भरती २०२० साठी अर्ज करायचे आहेत, त्यांनी आयबीपीएसच्या ऍप्लिकेशन पोर्टल ibpsonline.ibps.in वर जाऊन त्यांनी नोंदणी करावी. लिपिक पदांच्या नोंदणीसाठी संस्थेने २३ सप्टेंबर २०२० ची अंतिम तारीख निश्चित केली आहे. त्याचबरोबर उमेदवारांना २३  सप्टेंबर २०२० पर्यंत लिपिक पदासाठी विहित अर्ज शुल्काचे ऑनलाइन पेमेंट करणे, त्यांच्या अर्जात बदल करणे आणि ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची प्रिंटाऊट घेता येईल. उमेदवार खाली दिलेल्या थेट संकेतस्थळाद्वारे आयबीपीएस लिपिक अधिसूचना २०२०  डाऊनलोड करू शकतात.

आयबीपीएस लिपिक २०२०  ऑनलाइन अर्ज पृष्ठावर प्रवेश करू शकतात. आयबीपीएस लिपिक २०२० ऑनलाइन अर्जासाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी पास पाहिजे आणि आयबीपीएस पोर्टलवर नोंदणीच्या वेळी पदवीधर मार्कशीट व पदवी प्रमाणपत्र उपलब्ध असावे, जेणेकरून त्यांचा पास टक्केवारी ऑनलाइन फॉर्म भरताना प्रवेश करण्यास सक्षम व्हावा.

शैक्षणिक पात्रतेसह उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०२०  रोजी किमान  २०  वर्षे आणि जास्तीत जास्त २८ वर्षे एवढे असावे, म्हणजे उमेदवाराचा जन्म २ सप्टेंबर १९९२ पूर्वी आणि १ सप्टेंबर  २००० नंतर झालेला नसावा, ज्यात दोन्ही तारखांचा समावेश असेल. आयबीपीएस लिपिक २०२०  ऑनलाइन अर्जासाठी पोर्टलला भेट दिल्यानंतर उमेदवारांनी प्रथम नवीन नोंदणीसाठी लिंकवर जाऊन नोंदणी करावी. नोंदणीसाठी नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीचा तपशील भरावा.  नोंदणीनंतर उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि संकेतशब्द संस्थेद्वारे ईमेल आणि मोबाईल नंबर पाठविला जाईल, ज्याद्वारे उमेदवार लॉग इनद्वारे त्यांचे आयबीपीएस लिपिक २०२  ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकेल.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters