1. बातम्या

Nashik Onion Update : कांदा प्रश्न आता दिल्ली दरबारी; २९ सप्टेंबरला महत्त्वाची बैठक

राज्यात पेटलेला कांदा प्रश्न सोडवण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी दिल्लीत बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीला राज्याचे मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित असतील, अशीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Onion News Update

Onion News Update

Onion News :

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांचा संप सलग आठव्या दिवशी कायम आहे. काल (दि.२६) रोजी मुंबईत कांदा प्रश्नी तोडगा काढण्यासाठी दोन बैठका झाल्या. मात्र या दोन्ही बैठकात तोडगा निघाला नाही. यामुळे व्यापाऱ्यांनी संप कायम ठेवला आहे. लासलगावसह जिल्ह्यातील १७ बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होऊ लागलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देखील कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांची मुंबईत बैठक पार पडली आहे. मात्र बैठकीतूनही कोणता तोडगा निघाला नाही. व्यापाऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारशी संबंधित असल्याने त्याबाबत काल सह्याद्री अतिथी गृहावर राज्याचे मंत्री आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीतूनही कोणता तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आणखी संकटात सापडत चालले आहेत.

राज्यात पेटलेला कांदा प्रश्न सोडवण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी दिल्लीत बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीला राज्याचे मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित असतील, अशीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मागील आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदी बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संप मागे घेऊन तात्काळ कांदा खरेदी करावी, असं आवाहन यावेळी राज्यातील मंत्र्यांनी आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे.

व्यापाऱ्यांच्या काय आहेत मागण्या?
१) बाजार समित्यांमध्ये नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा थेट बाजारात विक्री करू नये.
२) ग्राहकांना रेशन मार्फत खरेदी केलेला कांदा द्यावा.
३) कांद्यावर लादलेले ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे.
४) संपूर्ण देशात विक्रेत्याकडून चार टक्के आडत घ्यावी.
५) देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट ५० टक्के सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी.
६) बाजारभाव वाढल्यानंतर चौकशी करू नये.

English Summary: nashik onion update Important meeting on 29 september Published on: 27 September 2023, 10:52 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters