1. बातम्या

शेतकऱ्यांना नाबार्डची मदत; खरीप पिकांसाठी ५ हजार कोटींचा निधी

नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात (नाबार्ड) ने खरीप शेतीसाठी देशभरातील शेतकऱ्यांना रोख रकमेची व्यवस्था करण्यासाठी ५००० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. अम्फान चक्री वादळामुळे पश्चिम बंगालमधील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात (नाबार्ड) ने खरीप शेतीसाठी देशभरातील शेतकऱ्यांना रोख रकमेची व्यवस्था करण्यासाठी ५००० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. अम्फान चक्री वादळामुळे पश्चिम बंगालमधील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नाबार्डने बंगालला १०७० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला. तर ५००० कोटींची ही रक्काम सहकारी बँका, ग्रामीण बँका, मायक्रो फायनान्स संस्था आणि एनबीएफसीद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात वितरित केली जाईल.

खरीप हंगामासाठी नाबार्डने नुकताच २७६ कोटी वितरित केला आहे. पश्चिम बंगालमधील नाबार्डचे मुख्य जनरल मॅनेजर सुब्रत मंल यांनी बँकेला ३९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. लॉकडाऊनमुळे ६ महिने कर्जदारांकडून हप्ते वसूल करण्यास सरकारने बंदी घातली आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. खरीप हंगामात शेतीसाठी रोख रकमेच्या पूर्ततेसाठी ५००० हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम विविध वित्तीय संस्थांद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना कर्ज म्हणून वितरित केली जाईल.

पश्चिम बंगालमधील शेतीच्या मोठ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्याला अतिरिक्त १०७० कोटी रुपये देण्यात आले आहेत. यातील रक्कम राज्यातील २० लाख शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी वापरली जाणार आहे. जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्यांना व्याजातून विशेष सूट मिळेल. देशभरातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट साठी २ लाख करोड रुपये खर्च केले जातील.

English Summary: NABARD assistance to farmers; Rs 5,000 crore fund for kharif crops Published on: 19 July 2020, 05:15 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters