जर आपण भारताचा चालू हंगामाचा विचार केला तर भारतामध्ये हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले. नाफेडने शेतकऱ्यांकडून 25 लाख 50 हजार टन हरभरा हमीभावाने खरेदी केला. जर आपण कडधान्यांच्या बाबतीत सरकारकडे असणाऱ्या बफर स्टॉकचा विचार केला तर तो 23 लाख टन असणे गरजेचे आहे परंतु प्रत्यक्षात मात्र हा स्टॉक 36 लाख टन इतका आहे.
नाफेड कडे जो काही 30 लाख टन हरभरा आहे त्यापैकी पाच लाख टन हरभरा 2020-21 चा हंगामातील असून तो नाफेड आता विक्रीसाठी खुल्या बाजारात घेऊन येत आहे.
एवढेच नाही तर या प्रक्रियेसाठी ऑनलाइन निविदा देखील मागविल्या जाणार आहे. नाफेडचा हरभरा महाराष्ट्रातच नव्हे तर चालू दरानुसार मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात विकला जाणार आहे.
सध्या हरभऱ्याची बाजार स्थिती
जरा पण सद्यस्थितीत हरभऱ्याचा भावाचा विचार केला तर तो हमीभावापेक्षा देखील कमी आहे. 5230 रुपये सरकारने हमीभाव जाहीर केला आहे मात्र सध्या दर 4200 ते 4 हजार 600 प्रति क्विंटलच्या दरम्यान घेतला जात आहे. परंतु जर नाफेडने त्यांच्या बफर स्टॉक मधला हरभरा जर खुल्या बाजारात आणला तर त्याचा विपरीत परिणाम हरभरा दरावर होण्याची शक्यता आहे.
यासाठी शेती क्षेत्रातील काही जाणकारांचे मत आहे कि नाफेडने हा हरभरा खुल्या बाजारात न आणता रेशनवर द्यावा किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विकावा. परंतु काही जाणकारांच्या मते खुल्या बाजारात हरभऱ्याचा साठा जरी विकला तरी सध्याच्या बाजारभावानुसार त्याचा परिणाम होणार नाही.
नक्की वाचा:Agri News: 'या' तारखेपासून सुरू होईल या वर्षीच्या ऊस गळीत हंगाम,वाचा माहिती
Share your comments