युती सरकारच्या काळामध्ये जलयुक्त शिवार योजनेला सुरुवात झालेली होती. जे की या योजनेमागचा एक उद्देश होता की जलसंधारणाची कामे होऊन पाण्याची पातळी वाढावी. या योजनेची सुरुवात बीड जिल्ह्यात झालेली होती मात्र आता बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात या योजनेला चांगलाच सुरुंग लागलेला आहे. २०१६- २०१८ या दोन वर्षांमध्ये या कामांची जेव्हा चौकशी केली त्यावेळी असे समजले की या योजनेचे पाणी मुरले आहे जे की यामुळे पहिल्या टप्यात १३९ गुत्तेदारावर व २४ कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आले होते जे की यांच्याकडून ४ कोटी ५० लाख रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. दुसऱ्या टप्यात थेट कारवाईच सुरू झालेली आहे जे की निवृत्त अधिकाऱ्यांना परळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आता नंबर कुणाचा?
ज्यावेळी चौकशी करण्यात आली त्यावेळी हे प्रकरण किती गंभीर आहे ते समजले. परळी तालुक्यात जलयुक्त शिवार तर झाले नाहीच पण पाणी कुठे मुरतेय हे समोर आले. चौकशी झाल्यानंतर आतापर्यंत निवृत्त कृषी अधिकारी वर्गावर कारवाई झाली आहे जे की यामध्ये कृषी अधिकारी विजयकुमार भताने यांचा सुद्धा समावेश आहे. यांच्यापुढे कोणाचा नंबर लागतोय हा प्रश्न आता उपस्थित राहिला आहे. पण आता जो पर्यंत १०० टक्के चौकशी होत नाही तो पर्यंत शांत बसणार नाही असे वसंत मुंडे यांनी म्हणले आहे.
जससंधारणाची कामे कागदावरच :-
ज्यावेळी जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे होत्या त्यावेळी या योजनेची सुरुवात बीड जिल्ह्यामधून सुरू केली होती. परळी मतदार संघाचे नेतृत्व धनंजय मुंडे तसेच पंकजा मुंडे करतात मात्र त्यांच्या च तालुक्यात अशी बोगस कामे होत आहेत असे चौकशी दरम्यान समोर आले आहे. ३०७ कामांची तालुक्यात तपासणी करण्यात आलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्ते वसंत मुंडे यांनी संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. जास्त कामे तर कागदावर दिसत असून प्रत्यक्षात झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या योजनेदरम्यान पाणी नक्की कुठे मुरतेय हे समोर येत आहे.
4 पथकांकडून तपासणी कामे :-
बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेखाली बोगस कामे होत आहेत अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते वसंत मुंडे यांनी उच्च न्यायालायत नेहली आहे. २०१६-२०१८ या वर्षांमध्ये झालेल्या कामांची तपासणी करण्यासाठी ४ पथकांची नेमणूक करण्यात आलेली होती जे की या चौकशी नंतर हा प्रकार समोर आलेला आहे. मागील महिन्यात कृषी अधिकाऱ्यांना ताब्यात घेणार आले होते तर सोमवारी शिवाजी हजारे, विजयकुमार भताने, पांडुरंग जंगमे, अमोल कराडयांना अटक करण्यात आले आहे.
Share your comments