
आमदाराने थेट गटारात उतरून केले आंदोलन
नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेते पुढाकार घेत असतात. नागरिकांसोबत आंदोलनाद्वारे सहभागी होऊन त्यांना साथ देत असतात. मात्र सध्या एक आमदार त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. नागरिकांना येता जाता खुल्या गटारीचा फार त्रास होत होता. महापालिकेकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारीदेखील केल्या मात्र त्या सगळ्यांकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. अखेर जनतेसाठी आमदार कोटामरेड्डी श्रीधर आंदोलन करण्यासाठी तयार झाले.
कोटामरेड्डी श्रीधर हे वायएसआर काँग्रेसचा नेल्लोर ग्रामीण मदतारसंघाचे आमदार आहेत. नेल्लोरमधील उमारेड्डीगुंटा भागातील खुले गटारीच्या त्रासाला नागरिक कंटाळले होते . गेली दहा वर्षे गटार बंद व्हावे अशी मागणी केली जात होती. मात्र महापालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत होते. गटारीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आमदार कोटामरेड्डी श्रीधर यांनी देखील निवेदन केले होते.
मात्र त्याकडेही महापालिकेने दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांनी शेवटी आंदोलनाचाच निर्णय घेतला.आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन गटाराच्या ठिकाणी पोहचले. कुणाला काही कळायच्या आताच ते गटारात उतरले. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र ते काही थांबले नाहीत. गटारीतून एवढी दुर्गंधी येत होती तरीही त्यांनी काही काळ गटारात पाय ठेवून बाजूच्या कठड्यावर बसले होते.
शेतकरी कर्जदारांनी फिरवली पाठ; बँकेची आर्थिक परिस्थिती डबघाईस
त्यांच्या आंदोलनामुळे महापालिका अधिकारीही ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. जोपर्यंत महापालिकेकडून कामाची शाश्वाती मिळत नाही तोपर्यंत कोटामरेड्डी यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले नाही. यासोबतच त्यांनी काम दिलेल्या वेळेत पूर्ण झाले नाही तर पुन्हा आंदोलन करणार असा इशारा देखील दिला.
कोटामरेड्डी यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच महापालिका अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कोटामरेड्डी यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले. मात्र काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाही तर पुन्हा आंदोलन करणार असा इशारा देखील त्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या:
आता बिअरच ठरणार तुमच्या शरीरासाठी फायदेशीर, संशोधनातून आली फायद्याची माहीती समोर
उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचे मातोश्रीबाहेर निधन
Share your comments