जर मनात काही आशा आकांशा असतील आणि तुम्ही पूर्ण ताकत लावून कष्ट केल्यास यशस्वी होणे कठीण नाही हे शिवकांत कुशवाहा यांनी दाखवून दिले आहे. स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी यशस्वी होऊन दाखवलं आहे.
शिवकांत कुशवाहा यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे त्यांचे वडील शेतकरी असून आई शेतात काम करते तसेच शिवकांत स्वतः भाजी विकून सिव्हिल जज होण्यापर्यंत त्यांचे जीवन आपण जाणून घेऊया. अमरपाटण तालुक्यातील शिवकांत हे पूर्वी भाजीपाला विकायचे.
आता त्यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. त्यांनी ओबीसी प्रवर्गात संपूर्ण राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. न्यायाधीश पदापर्यंत पोहोचण्यासाठी कोणतेही प्रशिक्षण घेतले नसून स्वयंअध्ययनातून यश संपादन केले असल्याचे ते सांगतात. कष्टाचे चीज झाल्याचे यावरून समजते. दिवाणी न्यायाधीश झाल्याची बातमी समजताच संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
शिवकांत कुशवाह यांचे कुटुंब आजही कच्च्या घरात राहत राहतात. यांचे आई वडील घर चालवण्यासाठी कष्ट करत होते. शिवकांतला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी भाजीचा विकली.
मात्र त्यांनी परिस्थिती समोर हार मानली नाही आणि आज यशापर्यंत पोहचले आहेत. दिवाणी न्यायाधीश शिवकांतचे वडील लाल कुशवाह आपल्या थोड्याश्या शेतीत भाजीपाला पिकवतात आणि विकतात. आईच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची अवस्था बिकट झाली.
शिवकांतला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीकडे त्यांनी दुर्लक्ष न करता कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो उसाच्या रसाचा गाडाही चालवला आहे. शिवकांत चार वेळा अपयशी ठरला, तरीही त्याने हार मानली नाही.
तो सांगतो की इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने दररोज १२ तास अभ्यास केला. सुरुवातीचे शिक्षण अमरपाटण व त्यानंतर रीवा येथून एलएलबी करत अभ्यासासोबत कोर्ट प्रॅक्टिस करून न्यायाधीशांच्या परीक्षेची तयारी सुरू करत न्यायाधीश बनले.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! SBI बँक आपल्या ग्राहकांना देत आहे सोन्याचे कॉइन; काय आहे ही खास स्कीम जाणुन घ्या
ऐकावे ते नवलंच! सकाळी-सकाळी ब्रश न करता पाणी पिल्याने 'हे' होतात जबराट फायदे; वाचून विश्वास बसणार नाही
Share your comments