दूध दरात गेल्या काही दिवसांपासून अनेकदा वाढ होत आहे. आता देखील मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ केली असून फुल क्रीम दूध आता 63 रुपयांऐवजी 64 रुपये प्रतिलिटरने मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
मदर डेअरीने चौथ्यांदा दुधाच्या दरात वाढ केली आहे.16 ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि उत्तर भारतातील इतर शहरांमध्ये गायीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. मार्च आणि ऑगस्टमध्येही दुधाचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढवले होते.
यामुळे अनेकदा वाढ होत आहे, शेतकऱ्यांना देखील पैसे दिले जात आहेत. शेतकऱ्यांना देखील दुधाच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. यामुळे शेतकरी देखील समाधानी आहेत.
काय बोलता! हा चहा मिळतोय ९ कोटी रुपयांत एक किलो, वाचा काय आहे खासियत..
आता मदर डेअरीने टोकन दुधाच्या दरात प्रतिलिटर 48 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत दरवाढ केली आहे. मदर डेअरीच्या वाढलेल्या किमती आज पासून लागू केले जाणार आहेत. यामुळे आता वाढीव पैसे मोजावे लागणार आहेत.
शेतकऱ्यांनो देशी गाईच्या शेणापासून तयार करा पणत्या, लाखोंमध्ये होतेय कमाई, जाणून घ्या..
मदर डेअरीच्या प्रवक्त्याने सांगितले की, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून कच्च्या दुधाच्या खरेदीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा संपूर्ण डेअरी उद्योगात दुधाची मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या;
सौर प्रकल्पासाठी जमिनीला 75 हजार भाडे मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा..
महावितरणकडून पुन्हा वीज तोडणी सुरू, 11 हजार कृषीपंपाचा वीजपुरवठा केला बंद
शेतकऱ्यांनो आता इनवेल बोअरिंग साठी मिळणार २० हजार रुपये
Share your comments