यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने अनेकांची चिंता वाढली होती. यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. असे असताना आता मान्सून दाखल झाला आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता मान्सूनचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे कोकणला 2 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, तर पुणे, सातारा व नाशिक घाटात तीन दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रापासून गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात त्याचा जोर वाढत आहे. अरबी समुद्रातून गुजरात किनारपट्टी व केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकणला 28 जून ते 2 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
तोतापूरी जातीच्या बकऱ्याला ८ लाखांची बोली, बकरी ईदमुळे मोठ्या प्रमाणात दर वाढले...
तसेच ठाणे, नाशिक, पुणे, सातारचा घाट परिसर या भागात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 30 जूनपर्यंत संततधार पाऊस होईल. विदर्भाला 28 जून रोजीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
आता फक्त १ रुपयात मिळणार पीक विमा, अखेर सरकारने काढला आदेश..
मान्सूनने 98 टक्के देश व्यापला आहे. मंगळवारी मान्सूनने गुजरात राज्य पार करीत राजस्थानसह पंजाब व हरियाणाचा काही भाग व्यापला. आता फक्त दोन टक्के देश बाकी असून, राजस्थानसह हरियाणाचा काही भाग बाकी आहे. येत्या 48 तासांत तो 100 टक्के देश व्यापणार आहे.
काही दिवस टोमॅटो खाणं विसरा! आता टोमॅटो १२० रुपये किलोवर, पाऊस लांबल्याचा परिणाम..
ट्रॅक्टर अनुदानापासून शेतकरी वंचीत, अनुदान रखडल्याने शेतकरी अडचणीत...
पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून कशी काळजी घ्यावी? शेतकऱ्यांनो जाणून घ्या..
Share your comments