अनेक राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय; राज्यातील काही भागात उडीप

18 July 2020 11:42 AM By: भरत भास्कर जाधव


देशातील अनेक राज्यात मॉन्सून परत एकदा सक्रिय होत आहे. भारतीय हवामान विभागानुसार,  उत्तराखंड, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशबिहार, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.  परंतु राज्यात विविध धो-धो बरसणाऱ्या पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे.   हवामान विभागानुसार, १९-१९ जुलैपासून  मॉन्सून सक्रिय सक्रिय होण्यासह पुढिल तीन चार दिवसात अनेक राज्यात  दमदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.  दरम्यान आज कोकण किनारपट्टीलगत वेगवान  वारे वाहून तुरळक ठिकाणी  जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

राज्यातील इतर भागात ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या फालोदीपासून पश्चिम बंगालपर्यंत सक्रिय आहे. या प्रणालीचा पूर्वेकडील भाग हिमालयाच्या पायथ्याकडे  सरकत आहे. गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. महाराष्ट्रात हवेचे पूर्व- पश्चिम हवेचे जोडक्षेत्र आहे. दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा देखील कायम आहे. 

किनारपट्टीलगतच्या समुद्रात ढगांची दाटी  असली तरी महाराष्ट्राच्या  बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिल्याचे दिसत आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मध्यप्रदेशच्या मध्य भागावर चक्रीय वाऱ्याचं क्षेत्र बनलं आहे. स्कायमेटनुसारउत्तराखंड, उत्तरप्रदेशाच्या काही भागात , आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशआणइ उत्तरकडील आंध्रप्रदेशाच्या काही भागात हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता आहे.

 

Monsoon Monsoon reactivated monsoon rainfall rainfall kokan IMD weather forecast हवामान विभाग भारतीय हवामान विभाग मॉन्सून पाऊस मॉन्सून
English Summary: Monsoon reactivated in many states of the country, pushing the state to decline

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.