दोन आठवड्यांपूर्वीच मध्य महाराष्ट्रात दाखल झालेल्या मॉन्सूनने आतापर्यंत काठावर पास होऊ येवढीच कामगिरी आहे. आता पर्यंत सरासरी सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत फक्त ३६ टक्के पाऊस पडला आहे. जून महिन्याच्या पहिल्या १८ दिवसांत पडणाऱ्या सामान्य पर्जन्यमानात यंदा ६४ टक्के घट झाल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूने तीन दिवस उशिराने का होईना शनिवारी (ता.११) महाराष्ट्रात धडक दिली. गेल्या दोन आठवड्यांत मॉन्सूनने राज्य व्यापले. मात्र अजूनही बळीराजासह सर्वांनाच जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.
पहिले दोन आठवडे मॉन्सूनची कामगिरी अतिशय खराब असल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान विभागाच्या वतीने मागील तीस वर्ष पडणाऱ्या पावसाच्या आधारे सरासरी सामान्य पर्जन्यमान निश्चित केले जाते. मध्य महाराष्ट्रात जून महिन्यात पहिल्या १८ दिवस पडणाऱ्या या सामान्य पर्जन्यमानाशी तुलना केली असता. यंदा पर्जन्यमानात ६४ टक्के घट झाली आहे. तर पुणे जिल्ह्यात ६७ टक्के घट झाली आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा फक्त ३३ टक्के पाऊस मागिल १९ दिवसांत पडला आहे.
आता पर्यंत सरासरी सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत फक्त ३६ टक्के पाऊस पडला आहे. जून महिन्याच्या पहिल्या १८ दिवसांत पडणाऱ्या सामान्य पर्जन्यमानात यंदा ६४ टक्के घट झाल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूने तीन दिवस उशिराने का होईना शनिवारी (ता.११) महाराष्ट्रात धडक दिली. गेल्या दोन आठवड्यांत मॉन्सूनने राज्य व्यापले. मात्र अजूनही बळीराजासह सर्वांनाच जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.
बळिराजा चिंतातूर : आषाढीची पंढरपूरची वारी आली पण राज्यात अजूनही खरीपाच्या पेरणीसाठी आवश्यक पाऊस पडला नाही.दोन आठवड्यांपासून मॉन्सूने संपूर्ण राज्य व्यापले,मात्र पूर्वमोसमी पावसाच्या दोन-चार सरींशीवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काही आले नाही. मॉन्सूनच्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याने चिंता वाढविली आहे. येत्या आठवड्यात मॉन्सून सक्रिय होईल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.आता हीच आशा बळिराजाला आहे. निदान वारीच्या दिवसांत वरुणराजा कृपा करेल, अशी आस शेतकऱ्यांना आहे.१ ते १८ जून पर्यंतचे पर्जन्यमान (मिलिमीटर)विभाग - प्रत्यक्ष - सामान्यत सरासरी पाऊस मध्य महाराष्ट्र ३१.४ ८७.८कोकण १४२.३ ३६०.४मराठवाडा ५६.९ ८०.२विदर्भ ४१.२ ८७.१पुणे जिल्हा ३२.४ ९९.१
Share your comments