सध्या देशात अनेक ठिकाणी पाऊस गायब झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सध्याचा मान्सूनचा हंगाम गेल्या ११ दिवसांपासून ठप्प असल्याचं हवामान तज्ज्ञांच्या मत आहे. तसेच ही परिस्थिती जास्त कोरडे दिवस दर्शवत आहे.
अकरा दिवस पाऊस न पडणे हे चांगले लक्षण नाही. यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बिघडू शकते. सध्या शिगेला पोहोचलेल्या अल निनोचा परिणाम सध्याच्या खंड स्थितीत स्पष्टपणे दिसून येतो. जेव्हा मान्सूनचे कुंड (ट्रफ) उत्तरेकडे सरकते.
ही स्थिती हिमालयाच्या पायथ्याशी आणि पूर्व भारताच्या काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढवते, तर देशाच्या इतर भागांमध्ये ते कमकुवत करते. विशेषतः पश्चिमेला गुजरातपासून पश्चिम बंगाल आणि पूर्वेला ओडिशा पर्यंत विस्तारलेला प्रदेश त्याच्या कक्षेत येतो.
सरकारी नोकरी सोडून कोरफडीची शेती सुरु, आता कोटींमध्ये उलाढाल..
सक्रिय अवस्थेतून मान्सूनचा खंड सामान्य आहे. सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंताजनक बाब म्हणजे ही स्थैर्य १९५१ नंतरच्या सर्वात प्रदीर्घ स्तब्धतेकडे बोट दाखवत आहे. यामुळे येणाऱ्या काळात तरी पाऊस पडणार का.? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
आकडेवारी पाहिल्यास असे लक्षात येते की, गेल्या ७३ वर्षात अशा एकूण १० घटना घडल्या आहेत. की जेव्हा स्तब्धतेचा कालावधी १० दिवसांचा होता. १९७२ मध्ये सलग १७ दिवस पाऊस पडला नाही. १९६६ आणि २००२ मध्ये, अनेक प्रसंगी १० दिवसांसाठी स्तब्धतेचा कालावधी राहिला.
'साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा बाजारातील किमान बाजारभाव ३८ रूपये करा'
मान्सून उपखंडातून माघार घेण्यास अद्याप दीड महिना बाकी आहे, परंतु या हंगामात देशव्यापी पावसाचे प्रमाण आणि खरीप उत्पादन कसे राहील हे पाहणे बाकी आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कपिल जाचक यांना कृषी गौरव पुरस्कार, कृषी मंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान
पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार, एकनाथ शिंदे यांचे घोषणा..
मोदी सरकार देणार सर्वसामान्य लोकांना आनंदाची बातमी! पेट्रोलचे दर होणार कमी, जाणून घ्या...
Share your comments