सध्या अनेक ठिकाणी ज्यादा दराने खत विक्री केली जात आहे. यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. असे असताना आता खते विक्रेत्यांना (Fertilizer Seller) फोन करून 'कृषी विभागाचा अधिकारी (Bogus Agriculture Officers) बोलतोय. आपल्याबाबत जादा दराने खते विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे' असे सांगून पैशांची मागणी केली जात आहे.
यामुळे या तोतयेगिरी करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे आता कृषी विभागाकडून याबाबचा तपास सुरू आहे. यामध्ये फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन केले जात आहेत. याची टोळी सक्रिय झाल्याचा संशय निर्माण झाला आहे.
काही दिवसांपासून व्यक्ती 'मी नाशिक वरुन शिंदे साहेब बोलतोय' असे सांगत आहे. नाशिक जिल्ह्यातील रासायनिक खत विक्रेते यांना ९४०४७०९९५० या मोबाईल नंबरवरून फोन करून पैशांनी मागणी केली जात आहे. नांदगाव, सटाणा व येवला तालुक्यातील काही खत विक्रेत्यांना फोन आले आहेत.
कारखाने कसे विकत घेतले? आयकरची धाड पडलेल्या अभिजित पाटलांनी केला मोठा खुलासा
असे असताना या प्रकरणाचा कृषी विभागाशी किंवा या कार्यालयाशी कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. असा प्रकार आढळल्यास तत्काळ सबंधितांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
LED bulb; वीज गेल्यावर ४ तास लाइटिंग बॅकअप देतो 'हा' LED ब्लब, किंमत फक्त..
असा प्रकार आढळून आल्यास तत्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. नाशिक जिल्हा ॲग्रो डीलर्स असोसिएशन यांनाही पत्र दिले आहे. याबाबत आता पुढील तपास केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
Sugar Production; देशातील साखरेचं अतिउत्पादन ही अर्थव्यवस्थेसाठी समस्या, साखरेचं उत्पादन कमी करा..
मोठी बातमी! दूध संघावर एकनाथ खडसे यांचे वर्चस्व, महाजन गटाला मोठा धक्का..
ब्रेकिंग! पुरंदरमध्येच होणार विमानतळ, शिंदे- फडणवीस सरकारने दिले महत्त्वाचे निर्देश
Share your comments