केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र गेल्या काही निर्णयांबाबत शेतकरी वर्गाने चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. आता देखील केंद्र सरकारने अचानक किमान आधारभूत दराने हरभरा खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे आता राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी हताश झाले आहेत.
हरभरा खरेदीचे उद्दिष्ट्ये पूर्ण झाली असल्यामुळे केंद्र सरकारने हरभरा खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हरभरा खरेदीवर बंदी झाल्यामुळे तो बाजारात विकण्यासाठी गेले असता त्याला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र तरीही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडून हा निर्णय बदलण्याची आणि पुन्हा एकदा हरभरा खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.
काय म्हणाले अजित पवार -
या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "यंदा हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. 32.83 लाख मे. टन अपेक्षित उत्पादन असताना जवळजवळ 8.20 लाख मे. टन एवढे वाढीव उत्पादन होत आहे. त्यामुळे हरभऱ्याची खरेदी ही 28 जून 2022 पर्यंत वाढवावे अशी केंद्र सरकारला विनंती केली आहे. हरभऱ्याच्या खरेदीची अंतिम तारीख 29 मे 2022 असून तारीख वाढवण्याबाबतच्या निर्णयाला एक-दोन दिवसात मंजूरी देणे अपेक्षित असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
दरम्यान परभणी राज्यात हरभरा खरेदीला ५ हजार २३० रुपये प्रतिक्विंटल असा भाव होता मात्र 23मे रोजी दुपारी अचानक उद्दिष्टपूर्ती झाल्याचे कारण सांगत पोर्टलवर ऑनलाइन खरेदीची नोंदणी बंद करण्यात आली. अचानक खरेदी बंदी झाल्याने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. काही केंद्रांवर, ज्यांनी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केली नाही त्या हरभरा उत्पादकांना,
तसेच ज्यांना हरभरा खरेदीसाठीचे एसएमएस पाठविले होते पण त्यांची खरेदी बाकी होती अशा हजारो शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला योग्य भाव मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणजे आता बाजारात हरभराला हमीभावापेक्षा अत्यंत कमी दर मिळत असून शासन ही परवड थांबविण्यासाठी पुढाकार घेईल का? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या चार जिल्ह्यांतील 45 हजार 273 हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडून 6 लाख 36 हजार 4 क्विंटल हरभऱ्याची किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आली आहे. या जिल्ह्यांतील जवळजवळ 54 हजार 199 शेतकऱ्यांनी आपल्या हरभरा योग्य दरात खरेदी केला जावा म्हणून ऑनलाइन नोंदणी केली होती.
यापैकी प्रत्यक्ष खरेदीसाठी 52 हजार 48 शेतकऱ्यांना एसएमएस पाठवले होते. आणि 2 हजार 151 शेतकऱ्यांना एसएमएस पाठविणे बाकी होते. यासोबतच 6 हजाराहून अधिक शेतकऱ्यांची हरभरा खरेदी करणे बाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Monsoon forecast: मान्सून येतोय जवळ, आज केरळमध्ये दाखल होणार हवामान खात्याचा अंदाज
दाखवून दिले! परिस्थितीवर स्वार होऊन ऊसतोड मजुरांची चार मुले बनली डॉक्टर
Share your comments