2014 मध्ये सत्तेत आल्यापासून मोदी सरकार वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करीत आली आहे. येत्या काही दिवसात मोदी सरकार शेतकऱ्यांना तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठे गिफ्ट देणार असल्याचे समजत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधि योजनेचा अकरावा हप्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे.
यामुळे मोदी सरकार शेतकऱ्यांना होळीचे गिफ्ट देणार असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील एक आनंदाची बातमी देणार आहे मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करणार असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचारी समवेतच शेतकऱ्यांना सरकारकडून होळीची गिफ्ट मिळणार एवढे नक्की.
एप्रिल महिन्यात मोदी सरकार पीएम किसान सम्मान निधि योजना या आपल्या महत्वाकांक्षी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना अकराव्या हफ्त्याचे 2000 रुपये देणार आहे. मोदी सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत आतापर्यंत सुमारे 11 कोटी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे आता या योजनेचा अकरावा हप्ता हस्तांतरित केला जाणार असल्याने या अकरा कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, असे असले तरी या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना 31 मार्च 2022 च्या आधी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेचे जे पात्र शेतकरी केवायसी करतील त्यांनाच या योजनेचा पुढचा हप्ता वितरित केला जाणार आहे.
शेतकऱ्यांबरोबरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील मोदी सरकार कडून होळीच्या निमित्ताने मोठे गिफ्ट मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्र सरकार मोठी वाढ करणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता दिला जातो यामध्ये मोदी सरकार भरीव वाढ करून महागाई भत्ता 34 टक्के करणार आहे एकंदरीत महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मध्ये मोठे आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
याबरोबरच मोदी सरकार निवृत्त झालेल्या अर्थात पेन्शन धारी कर्मचाऱ्यांना देखील दिलासा देणार असल्याचे सांगितले जात आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच 65 लाखाहून अधिक पेन्शनधारी माजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची निराशा केली; आता पाच तारखेला कठोर निर्णय घेऊ: राजू शेट्टी
मोठी बातमी! इफको अजून 4 नॅनो युरिया प्लांट सुरु करणार; खत टंचाई दुर होणार का?
रस्त्याअभावी शेतकऱ्याचे लाखोंचं सोयाबीन वावरातचं कुजलं; असं काय विपरीत लातुरात घडलं…..!
Share your comments