शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! मोदी सरकारनं वाढवली १४ खरीप पिकांची MSP

02 June 2020 03:13 PM By: भरत भास्कर जाधव


केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठी खूशखबर दिली आहे. सरकारनं १४ खरीप पिकांचा सरकारी भाव वाढविण्याची घोषणा केली आहे, याविषयीची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री (Union Information and Broadcasting Minister) प्रकाश जावडेकर यांनी दिली. सरकारने खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये Minimum Support Prices म्हणजेच किमान समर्थन किंमत वाढ करण्यास परवानगी दिली आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने १४ खरीप पिकांच्या किमान समर्थन किंमत ५० टक्क्यांहून ८३ टक्के करण्यात आली आहे. यासह शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांच्या कर्जावर २ टक्क्यांची सूट देण्यात आली. आपले कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना आता ऑगस्टपर्यंत वेळ मिळणार आहे. दरम्यान या बैठकीत नियमित कर्ज देणाऱ्यांविषयी निर्णय घेण्यात आला. त्यांना अतिरिक्त ३ टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.

किमान समर्थन किंमत वाढलेली पिके

भूईमूग - ५ हजार २७५ रुपये प्रति क्किंटल

सोयाबीन - ३ हजार ८८०  रुपये प्रति क्किंटल

उडिद - ६ हजार  रुपये प्रति क्किंटल

मूग  - ७ हजार १९६ रुपये प्रति क्किंटल

तूर - ६ हजार  रुपये/क्विंटल

भात , धान  - १ हजार ८६८

ज्वारी  - २ हजार ६३० रुपये

बाजरी - २ हजार १५० रुपये

मक्का - १ हजार ८५० रुपये

२०२०-२१ या वर्षासाठी मूग, रागी, भूईमूग, सोयाबीन, तीळ , कापूसच्या किमान समर्थन किंमतीत ५० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री Union Information and Broadcasting Minister प्रकाश जावडेकर narendra modi मोदी सरकार modi government Kharif Crop Minimum Support Prices किमान समर्थन किंमत
English Summary: modi government increased the 14 karif crops msp

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.