1. बातम्या

ऐकलं का! आता पीक पाहणी होणार मोबाईल ने

KJ Maharashtra
KJ Maharashtra
crop survey

crop survey

 आता राज्यातील पीक पाहणीमोबाईल च्या माध्यमातून होणार आहे.यासाठी सरकारला टाटा ट्रस्ट विशेष मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करून देणार आहे.या मोबाईल ॲप्लिकेशन ची यशस्वी चाचणी सेलू, बारामती व पालघरच्या काही भागात करण्यात आली. या मोबाईल  द्वारे पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे. त्या मोबाईल मध्ये एप्लीकेशन  डाउनलोड करावे लागेल.

 या ॲपच्या माध्यमातून एक शेतकरी त्याच्या मोबाईलवर जवळपास पंधरा खातेदारांच्या शेतजमिनीची व पिकांची माहिती लिहू शकतो.  इतकेच नाही तर या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये महसूल विभागाचा डाटा ही गोळा करण्यात आला आहे. गोळा करण्यात आलेल्या डाटाच्या  च्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याच्या शेत जमिनीचा सर्वेक्रमांकासह मिळेल.

त्यानंतर शेतकऱ्याला आपले शेती क्षेत्र शेतामधील पिकांचा प्रकार, शेती क्षेत्रात पिकांची लागवड केली व त्यातून अपेक्षित उत्पादन अशी माहिती  ॲप वरील कॉलम मध्ये लिहायचे असते.

 या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्याने केलेल्या नोंदी थेट महसूल खात्याला मिळणार आहे. त्याप्रमाणे महसूल खात्याकडे गाव, तालुका, जिल्हा, राज्य स्तरावरील नोंदी महसूल खात्याकडे जमा होतील. या जमा झालेल्या माहितीचेशास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केले की संबंधित गावाचे, जिल्ह्याचे व राज्याची संपूर्ण आणि सखोल माहिती एका क्लिकवर जमा होईल तसेही जमा झालेली माहिती 

शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबार्‍यावर ही नोंदवली जाणार आहे. या ई पिक पाहणी ती सुरुवात या खरीप हंगामापासून केली जाणार आहे. त्यासाठी कृषी विभागाकडूनविविध समाज माध्यमांचा उपयोग करून त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यात येत आहे.याबाबतची माहिती गावातील अँड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्या विद्यार्थ्यांनाही देण्याचा विचार कृषी विभागात सुरू आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters