राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत होत्या. मुख्यमंत्री पदाची धुरा एकनाथ शिंदे यांनी हाती घेतल्यानंतर त्यांचा सोशल मीडियावर शेतीत काम करत असतानाचा विडिओ चांगलाच वायरल झाला होता. आता पुन्हा एकदा एका आमदाराचा शेतात काम करत असतानाचा फोटो वायरल होत आहे. महाराष्ट्र विधानमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव हे आता शेतीच्या गुंतले आहेत.
विधानभवनात बहुमत चाचणी वेळेस शिवसेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेणारे भास्कर जाधव सत्तांतरानंतर आता आपल्या गावाकडील शेतीच्या कामात गुंतले आहेत. कोकणातील शिवसेनेचे आमदार त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावात आपल्या कुटुंबासमवेत शेतात काम करत असताना दिसले. एकत्र कुटुंब असणारे भास्कर जाधव हे दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये तसेच भाजीपाला लागवड करतात.
Scorpio:शेतकऱ्यांसाठी आहे 'हे'खास फीचर, स्कार्पिओ-एन आहे शेतकऱ्यांची राणी
समाजकारण आणि राजकारणातून वेळ काढून भास्कर जाधव हे शेतीलाही प्राधान्य देत आहेत. दरवर्षी न चुकता ते स्वतः शेतीकामासाठी पुढाकार घेतात.पॉवर टिलरने शेती नांगरणे तसेच इतर शेती कामातही त्यांचा हातभार असतो. त्यांच्या शेतीकामाचा विडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. मध्यंतरी देवेंद्र भुयार यांनीदेखील थेट शेतात औत हाती घेतले होते. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले पहिली शेती, नंतर समाजकारण आणि मग राजकारण अशी आमची सामाजिक जीवनातील व्याख्या आहे. शेती ही फार महत्वाची आहे. शेतीत राबणं खूप गरजेचं असल्याचे देवेंद्र भुयार सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
महापालिकेचे दुर्लक्ष; आमदाराने थेट गटारात उतरून केले आंदोलन
शेतकरी कर्जदारांनी फिरवली पाठ; बँकेची आर्थिक परिस्थिती डबघाईस
Share your comments