1. बातम्या

कृषी मंत्र्यांच्या हस्ते सात मध चाचणी प्रयोगशाळा आणि प्रक्रिया युनिटचे उद्घाटन

जम्मू आणि काश्मीर मधील पुलवामा, बांदीपूर आणि जम्मू, कर्नाटकातील तुमकूर, उत्तर प्रदेशातील सहारनपूर, महाराष्ट्रातील पुणे आणि उत्तराखंड येथे मध चाचणी प्रयोगशाळा आणि प्रक्रिया युनिट्सचे गुजरातमधून अनावरण करण्यात आले असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

Minister of Agriculture inaugurates seven honey testing laboratories and processing units

Minister of Agriculture inaugurates seven honey testing laboratories and processing units

जम्मू आणि काश्मीर मधील पुलवामा, बांदीपूर आणि जम्मू, कर्नाटकातील तुमकूर, उत्तर प्रदेशातील सहारनपूर, महाराष्ट्रातील पुणे आणि उत्तराखंड येथे मध चाचणी प्रयोगशाळा आणि प्रक्रिया युनिट्सचे गुजरातमधून अनावरण करण्यात आले असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

पाच राज्यांमध्ये सात मध चाचणी प्रयोगशाळा आणि प्रक्रिया युनिटचे उद्घाटन केल्यानंतर, देशात 'स्वीट रिव्होल्यूशन' आणण्यासाठी सरकार गांभीर्याने काम करत असल्याचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी सांगितले. जागतिक मधमाशी दिनानिमित्त गुजरातमध्ये आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना तोमर म्हणाले, "देशात "गोड क्रांती" घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सरकार अतिशय गांभीर्याने काम करत आहे.

कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी म्हणाले की, सरकारने मधमाशीपालनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानासह आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून दिली आहे. "सरकार मधमाशीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल," असं  ते म्हणाले.

गुजरातचे कृषी मंत्री राघवजी पटेल यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी उत्तम उत्पन्न मिळवण्यासाठी वैज्ञानिक मधमाशी पालनाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. 'राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियान' या केंद्राच्या अर्थसहाय्य योजनेचे उद्दिष्ट पाच मोठ्या प्रादेशिक आणि १०० लहान मध आणि इतर मधमाशी उत्पादने चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचे आहे. 

त्यापैकी तीन जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत, तर २५ छोट्या प्रयोगशाळा स्थापन होण्याच्या प्रक्रियेत आहेत. प्रक्रिया युनिटच्या स्थापनेसाठी केंद्राकडूनही मदत केली जात आहे. देशात १.२५ लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त मधाचे उत्पादन केले जाते, त्यापैकी ६०,००० टन पेक्षा जास्त नैसर्गिक मधाची निर्यात केली जाते, असे निवेदनात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
अतिरिक्त उसाचा प्रश्न कोणामुळे? शिल्लक उसाची खरी कारणे आली समोर...

English Summary: Minister of Agriculture inaugurates seven honey testing laboratories and processing units Published on: 21 May 2022, 10:54 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters