नवी दिल्ली : पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. सामान्य व्यक्तीला दूध, चहा, यासारख्या मूलभूत वस्तू खरेदी करणे कठीण झाले आहे. किचनमधून पोळ्या बनवण्यासाठी लागणारी कणीक गायब झाली आहे. बिस्किटांसाठी मारामारी आहे.
दूध, चिकन खरेदी करणे परवडेनासे झाले आहे. बंदरावर सामान पोहचला आहे. पण, ते खरेदी करणे पाकिस्तानला शक्य नाही. दुधाची किंमत २१० रुपये प्रतिलीटर झाली आहे. काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा भाव आहे. चहापत्ती २ हजार ५०० रुपये किलो झाली आहे.
पाकिस्तान आयएमएफकडून मदतीची याचना करत आहे. जेणेकरून महागाईवर ताबा मिळवता येईल. अर्थव्यवस्था ढासळल्याने पाकिस्तानला कर्ज मिळणे कठीण झाले आहे. ग्राहकांना दूध, चिकन यासारख्या वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही. दुधाच्या किमती १९० रुपये प्रतिलीटरवरून २१० रुपयांपर्यंत गेल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत बायलर चिकनचे दरही गगनाला भिडले आहेत. आता याची किंमत ४८० ते ५०० रुपये किलो झाली आहे.
बोनलेस मांसाची किमत १ हजार ते १ हजार १०० रुपये प्रतिकिलो झाली आहे. मिल्क रिटेलर्स असोसिएशनने सांगितलं कीा, १ हजार पेक्षा जास्त दुकानदार दुधाची किंमत वाढवून विकत आहेत. दुधाच्या किमती २१० ते २२० रुपये प्रतिलीटर पर्यंत गेल्या आहेत. जीवंत कोंबड्या ६०० रुपये किलोग्रामने विकल्या जात आहेत. चिकनचे दर ६५० ते ७०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
कांदे २२० रुपये किलो
पाकिस्तानात कांदे २२० रुपये किलो मिळत आहेत. पोळ्या तेयार करण्यासाठी लागणारी कणीक १५० रुपये किलोच्या भावाने विक्री केली जात आहे. पेट्रोल, डिझेलसह आवश्यक वस्तूंचीही टंचाई जाणवत आहे. दूध, तांदुळ लोकांपर्यत पोहचत नाही. कणकीसाठी लोकं एकमेकांसोबत वाद करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; सातव्या वेतन आयोगामुळं लाखावर पोहोचला पगार
अशा वाढल्या किमती
बासमती तांदळाची किंमत १०० रुपयांवरून १४६ रुपये किलो झाली आहे. मोहरीचे तेल ३७४ रुपये लीटरवरून ५३२ रुपये किलो विकले जात आहे. पोळ्या मिळणे कठीण झाल्याने काही जण ब्रेडवर दिवस काढत आहेत. ब्रेडची किंमतही ६५ रुपयांवरून ८९ रुपये झाली आहे. एकंदरित प्रत्येक वस्तूच्या किमतीत दीडपट ते दोनपट वाढ झाल्याने सामान्य लोकं हैरान झाले आहेत.
Share your comments