जगभर कोरोना या विषाणू मुळे थैमान घातले आहे. अवघड अश्या या काळात अनेक लोकांचे जॉब नोकऱ्या गेलेल्या आहेत तसेच उद्योग धंदे बंद पडले आहेत आणि मोठया प्रमाणात सुद्धा महागाई ने तोंड वर काढले आहे.कोरोनाचं संकट असताना शेतकरी सुद्धा संकटात आला होता कारण रानात निघणारे उत्पन्न त्याला बाजारपेठा बंद असल्यामुळे घरीच ठेवावे लागले होते.
लॉकडाउन च्या काळात आणि सर्वत्र निर्बंध असल्यामुळें मागच्या काही दिवसात दुधाचे दर खूप उतरले होते. प्रत्येक भागात दुधाचे दर हे वेगवेगळे होते. या काळात दुधाचे भाव हे 17 रुपये प्रति लिटर ते 21 रुपये प्रति लिटर होते.या लॉक डाउन मुळे अनेक लोकांचे हातचे काम गेलं आहे आणि महागाई ने तोंड वर काढले आहे त्यामुळे मध्यम वर्गीय आणि सामान्य माणसाचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत.त्यातच आणखी वाढ म्हणजे 1 जुलै पासून अमूल दूध चे दुधाचे दर हे वाढणार आहेत. यामध्ये दुधात 2 रुपये प्रति लिटर वाढ होणार आहे.
हेही वाचा:वाणीचा प्रादुर्भावमुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई द्या- प्रशांत डिक्कर
1 जुलै पासून संपूर्ण जगभरात दुधाचे दराचे नवीन वेळापत्रक जाहीर होणार आहेत. तसेच अमूल च्या सर्व प्रॉडक्ट हे सुद्धा 2 रुपये ने महागणार आहेत. या मध्ये मावा, श्रीखंड, आम्रखंड, दही अश्या वेगवेगळ्या पदार्थाचा समावेश आहे.दुधाचे दर वाढल्या नंतर अमूल गोल्ड या प्रॉडक्ट ची किंमत ही 58 रुपये इतकी होणार आहे. तसेच अमूल ने दर वाढवल्यामुळे आता अनेक इतर डेअरी सुद्धा दर वाढवतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
परंतु याचा मोठा फायदा हा शेतकरी वर्गाला होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा पेंडीचा खर्च सुद्धा निघत न्हवता. परंतु दूध दर वाढीमुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे तसेच यातून दूध उत्पादनाला चालना मिळणार आहे. आणि शेतकरी वर्गाचा सुद्धा मोठा फायदा होणार आहे.
Share your comments