गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दरात मोठी वाढ केली जात आहे. आता मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता नवीन दूध दर वाढीचा पुन्हा सामान्यांना भुर्दंड बसणार आहे.
गोकुळने गायीच्या दूधामध्ये लिटरमागे प्रतिलीटर 3 रुपयांची तर अर्धा लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आजच्या दरवाढीमुळे गोकुळच्या गाईच्या दूध दरात प्रतिलिटर 54 रुपये झाला आहे.
येणाऱ्या काळात देखील देशात दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते, असं मत इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केले. जनावरांचा लम्पी आजार झाल्याने हे झाले आहे. या रोगामुळे पशुधन कमी झालं आहे.
'शेतकर्यांनो राज्य नको राज्यकर्ते बदला'
त्यामुळे दूध उत्पादन कमी झाले आहेत. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात मागच्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा पुन्हा एकदा वाढ केली आहे. गायीच्या दूधामध्ये लिटरमागे गोकुळने 3 रुपयांची वाढ केली आहे तर आरदा लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, देशात जानेवारी ते मार्च दरम्यान दुधाचे दर आणखी वाढणार असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे जनावरांच्या किमती देखील वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
ऊस शेती परवडणार! पठ्याने काढले 50 गुंठ्यांत थेट 120 टन ऊसाचे उत्पादन, वाचा शेतकऱ्याच व्यवस्थापन
50 हजारांचे प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली, 'या' दिवशी होणार जाहीर
नेतेच थकबाकीदार! औरंगाबादचे पालकमंत्री भुमरेंच्या पुत्राच्या नावावर 1 लाख 31 हजारांची थकबाकी
Share your comments