2025 पर्यंत दुध प्रक्रिया क्षमता दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

19 February 2020 04:56 PM


नवी दिल्ली:
भारतात गेल्या पाच वर्षात दूध उत्पादनात 6.4 टक्के दराने वाढ होत असून 2014-15 मधल्या 146.3 दशलक्ष मेट्रिक टनावरुन 2018-19 मध्ये हे उत्पादन 187.7 दशलक्ष मेट्रिक टन झाले आहे. दूध उत्पादनापैकी 54 टक्के दूध बाजारात विकण्यासाठी उपलब्ध असून 46 टक्के स्थानिक गरजांसाठी खेड्यांमध्ये राखले जाते. 

शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या विपणन योग्य दुधापैकी केवळ 36 टक्के दूध संघटित क्षेत्राकडून, सहकारी आणि खाजगी क्षेत्रांना समसमान विकले जाते. उर्वरित 64 टक्के अतिरिक्त दुधही संघटित क्षेत्राअंतर्गत आणण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षात सहकारी क्षेत्रात दुध खरेदीत 9 टक्के वाढ झाली आहे.

पशूपालन आणि दुग्धविकास विभाग दुध उत्पादकता वाढविण्यासाठी सातत्याने काम करत आहे. आनुवंशिक सुधारणा करुन उत्पादकता वाढविण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी हा विभाग प्रयत्नशील आहे. दुधाचा दर्जा उंचावण्यासाठीही नुकताच विशेष कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. सहकारी आणि खाजगी क्षेत्रासाठीही वित्तीय भागीदारीतून या कार्यक्रमाला गती देण्याचा प्रस्ताव आहे.

उत्तम उत्पादकता, उत्पादन खर्चात घट, दुधाचा आणि दुग्ध उत्पादनांचा उत्तम दर्जा यामुळे दुग्ध क्षेत्रात स्पर्धात्मकता निर्माण होईल आणि नफा वाढेल यातून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाढ होईल. यातून या क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढेल आणि ग्रामीण उत्पन्न आणि रोजगारालाही चालना मिळेल.

milk milk processing doubling milk production दुप्पट दुध उत्पादन दुध प्रक्रिया Government of India भारत सरकार
English Summary: Government to facilitate doubling of milk processing capacity up to 2025

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.