जागतिक महामारी कोरोना व्हायरसमुळे पूर्ण जग हैरान झाले आहे. भारतालाही याचा फटका बसला असून या आजार जास्त पसरू नये यासाटठी सरकारने देशात लॉकडाऊन लागू केला. परंतु लॉकडाऊन लागू केल्यानंतर अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. वेगवेगळ्या राज्यात पोट भरण्यासाठी आलेले मजदूर आपली रोजंदारी गमावून परत आपल्या मायदेशी परतले आहेत. दरम्यान अशा प्रवाशी मजदुरासांठी सरकारने एक सुखद बातमी देऊ केली आहे. या सर्व मजदुरांच्या बँक खात्यात सरकार दोन हजार रुपये टाकू शकते. पण त्यासाठी त्यांना पीएम किसान योजनेतून आपल्या नावाची नोंदणी करावी लागेल. याविषयीची माहिती केंद्रीय कृषी मंत्री राज्य मंत्री कैलाश चौधरी यांनी एका माध्यमाच्या मुलाखतीत दिली. अटी पूर्ण करणारे मजुरांनी आपल्या नावाची नोंदणी करावी. सरकार पैसे देण्यास तयार असल्याचे चौधरी म्हणाले. अशात शहरातून गावात आलेल्यांना ही याचा लाभ मिळणार आहे.
शेत जमिनीविषयीचा पुरवा असावा. यासह पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते नंबर आणि आधार नंबर द्यावा लागेल. येथे नोंदणी आपण घरी बसूनही करू शकतात. यासाठी आपण दिलेल्या संकेतस्थळावर जावे. (https://pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx) यावर क्लिक करुन आपण अर्ज करु शकता. जर कोणाचे नाव शेतीच्या कागदपत्रामध्ये आहे तर त्याच्या आधारावरुन लाभ मिळवू शकतील. जरी ते एकत्र कुटुंबात राहत असतील तरी ते याचा लाभ घेऊ शकतील. दरम्यान आपणास काही समस्या असतील किंवा योजनेविषयी काही माहिती हवी असेल तर आपण खालील नंबरवर संपर्क करावा.
पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन नंबर:155261
पीएम किसान लॅण्डलाइन नंबर्स: 011—23381092, 23382401
पीएम किसान हेल्पलाइन : 0120-6025109
ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in
केंद्र किंवा राज्य सरकारी नोकरीत असलेले. दहा हजार रुपयांपेक्षा अधिकची पेन्शन मिळवणारे या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. आयकर भरणारे शेतकरीही या योजनेपासून वंचित असतील.
Share your comments