नवीन वर्षाच्या सुरुवातीला पारा आणखी खाली येण्याची शक्यता :IMD

30 December 2020 11:34 AM By: KJ Maharashtra

कोल्डवेव्ह उत्तर भारतामध्ये वाढत असल्याने याचा परिणाम हरियाणा, राजस्थान तसेच संपूर्ण भारतामध्ये दिसून येत आहे . डोंगराळ भागात ताजी बर्फवृष्टी झाल्याने मंगळवारी उत्तर भारतात शीतलहरीची परिस्थिती तीव्र झाली.याचा परिणाम बऱ्याच भागात झाला आहे . हिमाचल प्रदेशात शीतलहरीची परिस्थिती तीव्र झाल्याने किमान तापमानात एक ते दोन टक्क्यांनी घट झाल्याचे आयएमडीने सांगितले.केयलॉंग, कल्प, डलहौसी आणि कुफरी हे शून्य तापमानाच्या खाली गेले आहे .

महाराष्ट्राच्या इतर भागातही किमान तापमानात घट झाली. नाशिकमध्ये 11.8 डिग्री सेल्सियस, पुणे येथे 13 डिग्री सेल्सियस व ठाणे येथे 17 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.भारत हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम अस्थिरतेमुळे जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी बऱ्यापैकी झाली आहे असे सांगितले .

शीतलहरीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत थंड वाढली आहे . नवीन वर्षाच्या संध्याकाळपर्यंत पारा आणखी खाली येण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली.कमीतकमी 2 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान तीव्र शीतलहरी असते.काश्मिरमधील बर्‍याच ठिकाणी मध्यम प्रमाणात हिमवृष्टी झाली आणि पर्यटन आणि व्यापाराशी संबंधित असणाऱ्यांनी याचा आनंद लुटला आणि नवीन वर्षाच्या संध्याकाळपासूनच व्यवसाय वाढण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. श्रीनगर येथे सकाळी सातच्या सुमारास हिमवृष्टी सुरू झाली असे अधिकाऱ्यांनी सांगितले .

weather forecast rainfall cold wave
English Summary: Mercury likely to drop further at the beginning of the new year: IMD

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.