आज मध्यरात्रीनंतर अकस्मात लागलेल्या भीषण आगीमुळे मेहकर तहसील कार्यालयाचा सुमारे ७५ टक्के भाग जळून भस्मसात झाला. या आगीमध्ये तहसील कार्यालयातील अनेक जुन्या व महत्त्वाच्या कागदपत्रांची देखील राखरांगोळी झाली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही..आज विझवण्यासाठी मेहकर, चिखली व लोणार नगरपालिकांचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले असून आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्यासह तहसीलदार गरकळ व पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन आग विझवण्याच्या कार्याला चालना दिली आहे.
याबद्दल थोडक्यात माहिती अशी की, मेहकर येथील अनेक वर्षांपासूनची जुनी इमारत असलेल्या तहसील कार्यालयाला आज रात्री १ ते २ वाजेदरम्यान अकस्मात आग लागली. कुणालाही कळण्याच्या आताच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीच्या ज्वाळांनी मेहकर तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या सुमारे ७५ टक्के भाग भस्मसात केला. या अग्नितांडवमध्ये कार्यालयातील बहुतेक सर्व फर्निचर, महत्वाची व जुनी कागदपत्रे देखील नष्ट झाली. सुदैवानं कुठल्याही प्रकारची मनुष्यहानी या आगीमध्ये झाली नाही. आग नेमकी कशाने लागले लागली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही तरीदेखील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच मेहकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्याचबरोबर तहसीलदार संजय गरकळ व त्यांचे सर्व सहकारी आणि आसपासचँया रहिवाशांनी आग विझविण्याचा कामाला सुरुवात केली. दरम्यान मेहकर, चिखली आणि लोणार नगरपालिकेच्या अग्निशामक बंबांना आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले. आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याची पाहणी केली. या आधीच्या प्रकारांमध्ये एक गोष्ट समोर आली असून ती म्हणजे मेहकर तहसील कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारची अग्निशामक यंत्रणा आजपर्यंत अस्तित्वात नव्हती
आणि या कार्यालयाचे फायर ऑडिट देखील आजतागायत करण्यात आले नाही. ही बाब अतिशय चिंतेची असून शासकीय कार्यालयामध्ये जर असे बेजबाबदारीचे वातावरण असेल तर अशा घटना घडणारच अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
कार्यालयातील बहुतेक सर्व फर्निचर, महत्वाची व जुनी कागदपत्रे देखील नष्ट झाली. सुदैवानं कुठल्याही प्रकारची मनुष्यहानी या आगीमध्ये झाली नाही. आग नेमकी कशाने लागले लागली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही तरीदेखील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रतिनिधी- गोपाल उगले
Share your comments