1. बातम्या

‘महाबीज’मध्ये मेगाभरती. कृषिमंत्री सत्तार यांची मोठी घोषणा.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
‘महाबीज’मध्ये मेगाभरती. कृषिमंत्री सत्तार यांची मोठी घोषणा.

‘महाबीज’मध्ये मेगाभरती. कृषिमंत्री सत्तार यांची मोठी घोषणा.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात आगामी काही दिवसांत ‘मेगा भरती’ करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलीय.त्यामुळे शेतकऱ्यांसह बेरोजगार तरुणांनाही मोठा दिलासा मिळाला आहे..अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, कृषिमंत्री सत्तार यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातील

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महत्वाचे असून, अकोल्यात ‘महाबीज’चे (Mahabeez Recruitment) मुख्यालय आहे.अकोल्यात 28 एप्रिल 1976 रोजी ‘महाबीज’ची स्थापना करण्यात आली.Mahabeez was established on 28 April 1976 in Akola. बियाणे उत्पादन, प्रमाणिकरण, बियाणे गुणवत्ता नियंत्रण, बियाणे प्रक्रिया, हाताळणी, ‘पॅकेजिंग’, बियाणे विपणन, बियाणे विक्री आदी कामे ‘महाबीज’मध्ये होतात.

‘महाबीज’च्या बियाण्यांत यावर्षी मोठ्या प्रमाणात तूट आढळून आली. त्याच वेळी ‘महाबीज’मधील रिक्त जागांचा मुद्दाही समोर आला आहे. अकोला दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री सत्तार यांच्यासमोर हा प्रश्न मांडला असता, त्यांनी आगामी दिवसांतच ‘महाबीज’मध्ये ‘मेगा भरती’ करणार असल्याची घोषणा केली.पंजाबराव कृषी विद्यापीठाची पाहणी दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अकोल्यातील डॉ. पंजाबराव कृषी विद्यापिठाची पाहणी केल्यावर

तेथील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. सोयाबीनच्या विषयावरून विद्यापीठातील अधिकाऱ्यांना कृषिमंत्री सत्तार यांनी चांगलेच खडसावले.‘पीडीकेव्ही अंबा’ या सोयाबीन वाणाचे जिल्हातील वितरण व लागवडीची आकडेवारी सांगताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाल्याचे दिसले.कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील नोकर भरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाले असून,

जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही नोकर भरतीवरील निर्बंध मागे घेतले असून, विविध विभागांमध्ये नोकर भरती केली जात आहे.पोलिस भरतीनंतर आता ‘महाबीज’मध्ये मेगाभरतीची घोषणा करण्यात आल्याने, राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे..अर्थात, ही भरती कधीपर्यंत होणार, किती पदांसाठी भरती केली जाणार, याबाबत माहिती मिळालेली नाही..

English Summary: Mega Bharti in 'Mahabeez'. A big announcement by Agriculture Minister Sattar. Published on: 03 September 2022, 02:47 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters