15 व्या वित्त आयोगाची भारतीय रिझर्व्ह बँकेसह बैठक

10 May 2019 08:20 AM


मुंबई:
15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, एन. के. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, बँकेचे उपराज्यपाल आणि इतर अर्थतज्ज्ञ यांच्यासमवेत तपशीलवार बैठक घेण्यात आली. या बैठकीत गव्हर्नर शक्तिकांता दास आणि 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, एन. के. सिंग यांनी उठवलेल्या काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

चर्चा करण्यात आलेल्या बाबी:

 • संबंधित राज्य सरकारांसाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्याची आवश्यकता.
 • सार्वजनिक क्षेत्राद्वारे कर्ज घेण्याची आवश्यकता.
 • ज्यावेळीविशेषतः वित्त आयोगाच्या पुरस्कारांचे मध्यमुदतीचे परीक्षण होत नाही किंवा याआधीही नियोजन आयोगाच्या पुरस्कारांबाबत आढावा घेण्यात आलेला नाही अशावेळी राज्य सरकारांच्या वर्तमान स्थितीसाठी वित्त आयोगाच्या निरंतर सेवा आवश्यक वाटतात.
 • राज्यांराज्यामधील बदलणाऱ्या खर्चाच्या नियमांनुसार खर्च संहिता आवश्यक.
 • आर्थिक वाढ आणि चलनवाढीबाबत राज्यांची भूमिका. उदाहरणार्थ: व्यवसाय सुलभीकरणात राज्यांची अहम भूमिका गरजेची.

रिझर्व्ह बॅंकेने वित्त आयोगाला वर्ष 2019-20 साठी राज्य सरकारांना करण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याबाबत सविस्तर तपशील सादर केला. त्यातील ठळक मुद्दे खालील प्रमाणे:

 • सरकारी वित्तव्यवस्थेतील रचनात्मक उलाढालींमुळे अर्थव्यवस्थेतील राज्यांचे महत्त्व वाढले आहे.
 • वर्ष 2019-20 मध्ये अंदाजपत्रकिय तरतुदीनुसार राज्यांची वित्तीय तूट कमी होण्याची अपेक्षा आहेपरंतु सुधारित अंदाजानुसार आणि वास्तविकतेवर आधारित कमीतकमी विचलित तूट (वित्तीय तूट कमी)
 • विशिष्ट घटक वित्तीय तूट चालवतात: या आधि उज्ज्वल डिस्कॉम आश्वासन योजना (UDAY), आणि 2018-19 मध्ये सुधारित अंदाजानुसार शेती कर्ज योजना व उत्पन्न सहाय्य योजना वित्तीय तूट नियंत्रित करतात.
 • आधुनिक व्याज देयता आणि महसूल प्राप्तीत वाढ होत असली तरीही उर्वरित कर्जामध्ये जीडीपी च्या टक्केवारीत वाढ होत आहे.

वर्ष 2019-20 च्या अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार राज्यांची अर्थसंकल्पीय तूट कमी असल्याचा अंदाज आहे. राज्यांच्या समस्या आणि आव्हानांवर रिझर्व्ह बँकेने अजून एक वृत्तांत सादर केला यामध्ये विपणी कर्जाचा उल्लेख आहे. याव्यतिरिक्त खालील बाबी सादर करण्यात आल्यात.

 • राज्य सरकारद्वारे बाजारातून कर्ज प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
 • दुय्यम बाजारातील तरलता सुधारणे- ती पुन्हा जारी करणेनॉन-स्टँडर्ड जारी करणेगुंतवणूकदार आधाराची व्याप्ती वाढवणे.
 • जोखीम असमानता- एडीएममधून बाहेर पडणेएसडीएलचे रेटिंगएसडीएलचे मूल्यमापनअधिक वारंवार माहिती.
 • सीएसएफ/जीआरएफच्या कॉर्पसचे सशक्तीकरण- सर्व राज्यांद्वारे उत्तरदायित्वासाठी आश्वासन आणि उर्वरित निर्देशित देयता टक्के.
 • रोखीचे व्यवस्थापन- रिझर्व्ह बँकेने राज्यांच्या रोखिच्या अंदाज क्षमता सुधारण्यासाठी सर्व राज्यांना विनंती केली की त्यांनीअल्पकालीन कर्जाच्या पर्यायाचा विचार करावा. 
 • उद्‌घोषणा- राज्यांनी अर्थसंकल्प सादर करतांना उच्च वारंवारिता तारखा द्याव्यातआर्थिक सांख्यिकी सादर करावी आणि ती सामान्य स्वरूपात तसेच संकीर्ण वेळापत्रकात द्यावीत.
 • आकस्मिक दायित्वे- विश्वासार्ह सांख्यिकीचा अभाव असल्याने एफआरबीएमच्या अंतर्गत संकलन व अहवाल प्रमाणिकरण आवश्यक आहेहमी जारी करण्यासाठी एकसमान मर्यादा लागू करणे आवश्यक आहे.

Reserve Bank of India रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एन. के. सिंग 15th Finance Commission 15 वा वित्त आयोग शक्तिकांता दास N. K. Singh Shaktikanta Das UDAY उज्ज्वल डिस्कॉम आश्वासन योजना
English Summary: Meeting of 15th Finance Commission with the Reserve Bank of India

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.