लागवड खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरण गरजेचे

01 March 2019 07:55 AM


परभणी:
वाढती शेत मजुरी व हंगामात मजुरांची कमतरता यामुळे पिक लागवडीचा एकुण खर्च वाढत असुन कृषी यांत्रिकीकरणाला पर्याय नाही. परंतु अल्‍पभुधारक, मध्‍यम व मोठे भुधारक शेतकरी यांची कृषी औजारे व यंत्राची गरज वेगवेगळी आहे. कृषी यांत्रिकीकरणामूळे पिक लागवडीचा खर्च कमी होवुन शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करणे शक्‍य आहे. कृषी यांत्रिकीकरणाकरिता कृषी यंत्र उद्योजक, शेतकरी व कृषी अभियंते यांच्यात समन्‍वयाची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुशक्तीचा योग्य वापर अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण दिनानिमीत्त दिनांक 28 फेब्रुवारी रोजी बैल व ट्रॅक्टरचलित सुधारित औजारांचे प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, विद्यापीठ अभियंता डॉ. अशोक कडाळे, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके, तालुका कृषी अधिकारी श्री. पी. बी. बनसावडे, परभणी आत्मा संचालक श्री. के. आर. सराफ आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी शेतकऱ्यांच्या व विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या समन्वयातून कृषी यांत्रिकीकरणाची चळवळ गतिमान झाली पाहिजे असे सांगितले तर शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण बळकट करून उन्नती साधावी असे मत आत्मा संचालक श्री. के. आर. सराफ यांनी व्यक्त केले.

यावेळी विद्यापीठातील ऊर्जा उद्यानामध्ये आयोजित सुधारित कृषी औजारे, अपारंपारिक ऊर्जा साधनांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिकाचे उद्घाटनही कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. कृषी अवजारे प्रदर्शनात विविध मोठ्या प्रमाणात कंपन्यांची बैल व ट्रॅक्टरचलित सुधारित कृषी औजारे, सौर चलित औजारे इत्यादींचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले. 

तांत्रिक सत्रात सेंद्रीय शेतीरेशीम उद्योगपशुधन संगोपअपारंपारीक उर्जा स्त्रोत इत्यादी विषयावर डॉ. सी. बी. लटपटेडॉ. अे. के. गोरेडॉ. डी. एस. चव्हाण, डॉ. आर. टी. रामटेके आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्‍पाच्‍या संशोधन अभियंता प्रा. स्मिता सोलंकी यांनी केलेसुत्रसंचालन डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी केले तर आभार प्रा. डी. डी. टेकाळे यांनी मानलेमेळाव्‍यास मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी मोठया संख्‍येनी सहभागी झाले होते. 

farm mechanization कृषी यांत्रिकीकरण Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
English Summary: mechanization is need to reduce the cost of cultivation

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.