द्राक्ष हे एक भारतातील प्रमुख फळपीक (Fruit Crop) आहे, याचे उत्पादन महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) अधिक होते. नाशिक जिल्यातील शेतकरी (Farmers) या पिकावर जास्त अवलंबून असतात. यंदा अवकाळी पावसाने द्राक्ष पिकाला जोराचा झटका दिला आहे, त्यामुळे उत्पादनात कमालीची घट घडून आल्याचे चित्र दिसत आहे. पण उत्पादन कमी असल्याने द्राक्ष पिकाला (Grapes crop) चांगला मोबदला (Profit) मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.
सरकारकडून द्राक्ष निर्यातीसाठी (Exports Of Grapes) किसान रेल्वेद्वारे (Kisan Railway) सेवा पुरवली जाते. परंतु हि सेवा पुरेशी नसल्याचे नमूद केले जात आहे. त्यामुळे सरकार दरबारीं (Government) हि समस्या मांडली जावी आणि अजून रेल्वे सेवा द्राक्ष निर्यातीसाठी बहाल केल्या जाव्या या मागण्या द्राक्ष बागायतदार संघाने केल्यात असे वृत्त प्रसार माध्यमातून समोर येत आहे.
वाईन सिटी (Wine City) म्हणुन जगात विख्यात असलेल्या नाशिक जिल्ह्यातून मोठया प्रमाणात द्राक्ष आपल्या शेजारील राष्ट्र बांग्लादेशला (Bangladesh) निर्यात केले जातात. म्हणून नाशिक टू बांगलादेश द्राक्ष निर्यात करण्यासाठी दहा टन क्षमतेची फॅनची सुविधा असलेली रेल्वे उपलब्ध करून देण्याची, तसेच मार्चपासून एसी रेल्वे बहाल करण्याची मागणी द्राक्ष व्यापाऱ्यांनी केली आहे.
द्राक्षे हे रेल्वेने पाठविण्यात आली तर वेळेत पोहचतील, याशिवाय त्याच्या क्वालिटीवर कुठलाही परिणाम होणार नाही त्यामुळे द्राक्षेला चांगला रेट देखील प्राप्त होईल. ट्रकने माल पोहचण्यास विलंब होतो, त्यामुळे द्राक्षला चांगला बाजारभाव (Market Price) मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होते. म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापाऱ्यांनी निर्यातीसाठी रेल्वे पुरवण्याची मागणी शासनदरबारीं केली आहे.
द्राक्षे बागायतदार आणि व्यापारी यांची बैठक (Meeting of grape growers and traders)
द्राक्ष निर्यात करताना येणाऱ्या अडचणी वर तोडगा (Solution) काढण्यासाठी द्राक्ष बागायतदार (Grape Growers) आणि व्यापारी (Grape Merchant) ह्यांच्यात एक बैठक नुकतीच पार पडली.
बैठकीत बांगलादेश मध्ये केली जाणारी द्राक्षे निर्यात कशी महत्वाची आहे या विषयावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच द्राक्षेला बांगलादेश मध्ये लागत असलेला कर (Duty) हा निम्म्यावर आणला जावा अशी मागणी देखील झाली. याशिवाय रेल्वेच्या वाहतुकीवरहि चर्चा झाली, रेल्वे बांगलादेश मध्ये पोहचण्यासाठी तीस तास लागतात, म्हणून वेळेत रेल्वे बाजारपेठेत पोहचवण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Share your comments