नुकत्याच काही दिवसांपूर्वी मान्सूनचे (Mansoon) केरळमध्ये दणक्यात आगमन झाले आहे. यामुळे मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजाला (Farmers) तसेच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे या वर्षी मान्सून हा समाधानकारक राहणार असून सामान्य पेक्षा जास्त पाऊस यंदा बघायला मिळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, मान्सूनचा (Mansoon Rain) प्रवास आता चांगला सुरू असून 5 जून पर्यंत मान्सून तळकोकण गाठणार आहे.
निश्चितच यामुळे महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळणार आहे. 5 जूनला जरी मान्सून दक्षिण कोकणात (Konkan) दाखल झाला तरी देखील मात्र संपूर्ण राज्यात मान्सून पोहोचण्यास विलंब होऊ शकतो असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती मंद असल्याने अचूक तारीख सांगता येणं थोडं अशक्य असल्याचे विभागाणे सांगितले. मात्र असे असले तरी राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा सुरू झाला असून येत्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस (Pre Mansoon Rain) बघायला मिळणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मध्य भारतात यंदा समाधानकारक मान्सून राहणार असून मान्सून काळात सामान्य किंवा सामान्य पेक्षा अधिक पाऊस बरसणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मध्य भारतात महाराष्ट्र आणि पुण्याचा समावेश होतो. यामुळे महाराष्ट्रात यंदा मान्सून काळात सामान्य किंवा सामान्य पेक्षा अधिक पाऊस राहणार आहे.
मध्य भारतात दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 106% पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातं आहे. याशिवाय संपूर्ण भारतात मान्सून सरासरीच्या 103 टक्के राहणार आहे. याचाच अर्थ इतर भागाच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रात चांगला मान्सून बघायला मिळणार आहे. मात्र जून महिन्यात पावसाचा खंड राहणार असल्याचे हवामान तज्ञ स्पष्ट करत आहेत.
Mansoon Rain: महाराष्ट्रात आजपासून पावसाला सुरवात; 'या' ठिकाणी धो-धो बरसणार पाऊस
यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देत आहेत. एकूणच काय जून महिन्यातील पावसाचा खंड वगळता या वर्षी मान्सून समाधानकारक राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत असून त्यांना यावर्षी चांगल्या उत्पादनाची आशा आहे.
मोठी बातमी! 'या' योजनेच्या माध्यमातून मिळणार प्रत्येकाला शेतजमीन; वाचा
Share your comments