1. बातम्या

IMD Alert: येत्या 24 तासात महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा

महाराष्ट्रातील शेतकरी तसेच उकाड्याने हैराण जनता चातकाप्रमाणे मान्सूनची (Mansoon) वाट बघत आहेत. दरम्यान मान्सूनचे केरळ (Mansoon Arrive In Kerala) मध्ये तीन दिवसांपूर्वी दणक्यात आगमन झाले आहे. येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्रात झळकणार आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
pre mansoon rain

pre mansoon rain

महाराष्ट्रातील शेतकरी तसेच उकाड्याने हैराण जनता चातकाप्रमाणे मान्सूनची (Mansoon) वाट बघत आहेत. दरम्यान मान्सूनचे केरळ (Mansoon Arrive In Kerala)  मध्ये तीन दिवसांपूर्वी दणक्यात आगमन झाले आहे. येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्रात झळकणार आहे.

पण याआधी राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची (Pre-Mansoon Rain) दस्तान बघायला मिळत आहे. आज देखील भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) राज्यातील काही जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाचे मते, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसाची शक्‍यता आहे. दरम्यान या भागात विजेचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे.

भारतीय हवामान विभागाचे कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या वैयक्तिक ट्विटर हँडलवर ट्विट करत माहिती देताना सांगितले की, कोकणातील तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची (Mansoon Rain) शक्यता आहे.

दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, आज राजधानी मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सांगली, सातारा, तसेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस देखील झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यालाही पावसाची जोरदार हजेरी आज बघायला मिळाली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस दिलासा मिळाला आहे. ढगाळ वातावरण व काही ठिकाणी पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात येत्या चार दिवसात मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेषता दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लगतच्या काही भागात विजेच्या गडगडाटासहसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

होसाळीकर यांनी ट्वीट करत याबाबत माहिती सार्वजनिक केली आहे. होसाळीकर यांच्या मते, आज देखील राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. निश्चितच यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस मोठा दिलासा मिळणार आहे मात्र शेतकरी बांधवांनी या काळात आपला शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे देखील गरजेचे राहणार आहे.

Mansoon 2022: सुरु झाला मान्सूनचा प्रवास; 'या' राज्यात कोसळणार पाऊस; महाराष्ट्राच्या तळकोकणात 'या' दिवशी मान्सूनचे आगमन

शिवाय या काळात वादळी वारे देखील वाहणार असल्याने शेतकरी बांधवांनी आपले पशुधन देखील सुरक्षित स्थानी ठेवावे असा सल्ला यावेळी तज्ञ लोक देत आहेत. निश्चितच राज्यात आता मान्सूनची चाहूल जाणवू लागल्याने शेतकरी बांधवांना मध्ये मोठे प्रसन्न वातावरण बघायला मिळत आहे.

Mansoon 2022: हवामान विभागाकडून तारीख पे तारीख!! आता 'या' तारखेला धडकणार मान्सून

English Summary: IMD Alert: Heavy rains to fall in 'Ya' district of Maharashtra in next 24 hours, Meteorological Department warns Published on: 02 June 2022, 03:49 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters