![](https://kjmarathi.b-cdn.net/media/26138/ax.jpg)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊस दरावरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. असे असताना आता राजू शेट्टी पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या बारामतीमधील कारखान्यांनी जास्तीचा दर दिला.
माळेगांव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपेक्षा प्रतिटन जादा ५०० रूपये जादा दर दिला. या साखर कारखान्यांनी दर देण्यास परवडते मग राज्यातील साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ४०० रुपये जादा दर द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटना करत आहेत.
या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अजित पवार यांना देण्यात आले. यामधून दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर राज्यातील ऊस ऊत्पादकांना दिलासा देण्यासाठी साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान ४०० रूपयाचा दुसरा हप्ता देण्याची मागणी केली जात आहे.
पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला पिकवून शेतकरी होणार मालामाल, सरकार 65% खर्च उचलणार
याबाबत कारखानदारांना आदेश करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन टप्यातील एफआरपी देण्याचा कायदा केलेला होता. सदर कायदा बदलून पुन्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी देण्याबाबत शिंदे सरकारने निर्णय घेतला, मात्र अजूनही त्याचा शासन निर्णय झालेला नाही. यामुळे हा निर्णय देखील मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.
शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट! औरंगाबादमध्ये एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या
Share your comments