1. बातम्या

चिचारी भुखंड घोटाळा प्रकरणाची पारदर्शी चौकशी करा -प्रशांत डिक्कर

मेहकर: संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथिल शेकडो एक्कर भुखंड घोटाळा प्रकरणी चौकशी

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
चिचारी भुखंड घोटाळा प्रकरणाची पारदर्शी चौकशी करा -प्रशांत डिक्कर

चिचारी भुखंड घोटाळा प्रकरणाची पारदर्शी चौकशी करा -प्रशांत डिक्कर

मेहकर: संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथिल शेकडो एक्कर भुखंड घोटाळा प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त असलेले मेहकर उपविभागाचे एस डि ओ राठोड यांची स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी मेहकर येथे भेट घेतली. संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथिल आदिवासींच्या शेकडो एक्कर जमिनी हडपल्या प्रकरणी प्रशांत डिक्कर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करुन कारवाई करण्याची मागणी केली होती. उपजिल्हाधिकारी अभिजीत नाईक 

यांनी ३० मार्च २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी मेहकर यांना चौकशीसाठी नियुक्त करण्यात आले. एस डि ओ राठोड यांनी या प्रकरणातिल चौकशीसाठी संग्रामपूर तालुक्यातील ६० लोकांना नोटीस देऊन २५ मे रोजी तपासकामी मेहकर येथे हजर राहण्याचे आदेश दिले होते. यापैकी काही लोकांनी आदेशाला न जुमानता सुनावनीला गैरहजर राहिले असल्याने पुढील सुनावणी २२ जुन रोजी संग्रामपूर येथे होणार असल्याचे एस डि ओ राठोड यांनी सांगितले. या घोटाळ्याची व्याप्ती खुप मोठी असल्याचे निदर्शनास आले आहे. 

बनावट कागदपत्रांच्या आधारे आदिवासींच्या जमिनी हडपल्या असुन त्याच जमिनीवर स्टेट बँक सोनाळा शाखेकडुन लाखो रुपयांचे कर्ज घेउन हे कर्ज महात्मा फुले कर्ज माफी योजनेतुन माफ करुन घेतले आहे. लवकरच हा आकडा बॅके कडुन उघड होईल. या जमिनीतील ३०/४० एक्कर जमिन बनावट कागदपत्रांच्या आधारे रजिस्टर खरेदीने विकली असल्याचे निदर्शनास आले.

या बाबत सब रजिस्ट्रार संग्रामपूर यांचे कडुन तपास अधिकारी यांनी माहिती मागवली आहे. 

या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार समाधान राठोड, तलाठी व मंडळ अधिकारी यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कॉग्रेसच्या एका नेत्याने कुटूंबातील लोकांच्या नावे ६५ एक्कर जमिन केली असल्याने यांच्यासह लवकरच अनेक नावे उघड होऊन यांचेवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. आदिवासींच्या जमिनी परत द्या. व जमिनी हडपनाऱ्यावर कारवाई करा. अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जिल्हा प्रशासनाकडे लाऊन धरली आहे. यावेळी दिलिप जयस्वाल, पंचायत समिती माजी सदस्य अख्तर मोरे,हम्मद केदार,फकिरा केदार सह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.

English Summary: Make a transparent inquiry into the Chichari plot scam case - Prashant Dikkar Published on: 26 May 2022, 09:10 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters