1. बातम्या

सागवान शेतीमधून मिळवा बक्कळ पैसा

किरण भेकणे
किरण भेकणे
teak tree

teak tree

शेती ही आपल्याकडे तोट्याचा व्यवसाय समजला जातो. पारंपरिक शेती मधील उत्पादनातील अनिश्चितता आणि पारंपरिक शेतीला होणारा खर्च यामुळं शेती तोट्याचा व्यवसाय समजला जातो. परंतु जर का आधुनिक (modern ) शेती आणि यांत्रिकी करण या चा उपयोग करून सुद्धा आपण बक्कळ पैसे कमवू शकतो.शेतकरी तरुण ट्रेक फार्मिंग करून सुद्धा बक्कळ पैसे कमवू शकता. आजच्या काळात शेतकऱ्यांसाठी ट्रेक फार्मिंग करणे एक योग्य संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतात.

सर्व लाकडात सागवान हे मजबूत असते:

आजकाल सर्वत्र सगवानचा उपयोग मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो. सागवानचा उपयोग प्लायवूड, जहाज  बांधणी  कारखाने, रेल्वे  चे डबे तसेच  अनेक  प्रकारच्या मौल्यवान वस्तू बनवण्यासाठी सुद्धा केला जातो.तसेच ही एक आयुर्वेदिक वनस्पती सुद्धा आहे. वेगवेगळ्या आजारांवर या पासून औषधे बनवली जातात. सर्व  लाकडात  सागवान हे  मजबूत असते शिवाय या लाकडाला कधीच वाळवी लागत नाही. हे लाकूड कमीत कमी 200 वर्ष टिकू शकते. त्यामुळे बाजारात याला मोठ्या प्रमाणात डिमांड आहे.

सागवान बाजारपेठ:-

गरजेच्या तुलनेत सागवान ची उत्पादन क्षमता ही केवळ 5 टक्के एवढीच आहे. त्यामुळे सागवान ची लागवड करून फायदा मिळवणे खूप सोपे आहे. उत्पादन क्षमता कमी असल्याने हे लाकूड सर्वात महागडे आहे. कारण उत्पादन हे खूप कमी प्रमाणात होत आहे.

अशा प्रकारे घ्या काळजी:-

सागवान वनस्पती वाढवण्यासाठी त्यास कोणत्याही अशी विशिष्ट मातीची गरज भासत नाही तर आपण ही वनस्पती सुपीक जमिनीत सुद्धा अगदी सहजपणे वाढवू शकतो.मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या ठिकाणी पाणी साचून राहते त्या ठिकाणी सागवान वनस्पती ची कधीच लागवड करू नये नाहीतर वनस्पती ची वाढ तर खुंटतेच आणि त्याचबरोबर अनेक रोगांच्या प्रादुर्भावाना सामना देखील करावा लागतो.कोरडे व दमट हवामान सागवणाची वनस्पती वाढण्यावण्यास मदत करते तसेच ज्या भागात सामान्य तापमान आहे त्या भागात सागवणाची वनस्पती चांगल्या प्रकारे वाढते.

हवामानानुसार बदलते वाण:-

सागवान वनस्पती चे चांगल्या प्रकारे उत्पादन भेटवायचे असेल तर त्याच्या प्रगत जाती निवडणे खूप गरजेचे आहे. या जातीचे उत्पन्न सगळीकडे पाहायला गेले तर सारखेच आहे मात्र वेगवेगळ्या हवामानानुसार त्याचे वाण आणि त्याची लागवड करणे खूप गरजेच आहे.पश्चिम आफ्रिकामधील सागवान, निलंबर मधील सागवान, दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील सागवान, आदिलबाद मधील सागवान तसेच गोदावरी सागरवाण आणि कोन्नी सागवान या सर्व प्रकारच्या झाडांची लांबी वेगवेगळी असते.

सागवान कसे जोपासावे:-

सागवाण वनस्पतींची लागवड करण्याआधी चांगल्या प्रकारे शेत नांगरून घेतले पाहिजे. शेतामध्ये असणारे जुन्या पिकाचे जे खोल  अवशेष आहेत ते  खोल  नांगरणी करून  काढून  टाकावेत तसेच शेतामध्ये कमीतकमी आठ ते दहा फुटाचे अंतर ठेवून दोन खड्डे काढावेत जे की दोन फूट रुंद आणि दीड फूट खोल असावेत.सागवान  वनस्पतीला जास्त प्रमाणात  खत   लागते. ५०० जीएम एन.पी.के. चे १५ किलो जुने शेणखत वनस्पती ची लागवड करण्याआधी शेतात टाकावे. सागवणाचे रोप लावण्याआधी एक महिना खड्डे काढावेत तसेच सागवणाची  रोपे  आणि  बिया अशी दोन प्रकारे लागवड करावी.

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters