आपल्याकडे विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वीजचोरी केली जाते. यामुळे अनेकजण वीजचोरी तर करतातच पण आपला जीव देखील गमावतात. असे असताना आता महावितरण याकडे गांभीर्याने लक्ष देणार आहे. आता वीजचोरी व विजेचा गैरवापर आणि इतर अनियमिता आटोक्यात आणण्यासाठी तसेच वीजचोरांविरुद्ध अतिजलद कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर आणखी दहा नवीन भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
याबाबतचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. यामुळे आता वीजचोरी करताना हजार वेळा विचार करावा लागणार आहे. वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणार्या प्रामाणिक वीजग्राहकांवर वीजदर वाढीचा बोजा पडतो. तसेच अनेकांचा जीव देखील जातो.
यामध्ये प्रामाणिकपणे वीजबिल भरणार्या ग्राहकांसाठी आता कडक पावले उचलली जाणार आहेत. त्यानुसार, महावितरणच्या भरारी पथकांनी एप्रिल ते जून-2022 या तीन महिन्यांच्या काळात वीजचोरीची तब्बल 131 कोटी 50 लाखांच्या 2 हजार 625 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. हा आकडा खूपच मोठा आहे.
टाटाची सर्वात स्वस्त CNG कार लॉन्च, मायलेजमुळे संपणार महागड्या पेट्रोलचे टेन्शन, जाणून घ्या..
महावितरणने सध्या 63 भरारी पथकांची तयारी केली आहे. या भरारी पथकांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या तिमाहीत वीजचोरीची 239.58 दशलक्ष युनिटच्या वीजचोरीची तब्बल 2 हजार 625 प्रकरणे उघडकीस आणली. यामध्ये वीजचोरांकडून सुमारे 54 कोटी 16 लाख 66 हजारांचा दंड वसूल केला आहे.
महत्वाच्या बातम्या;
काय तो पैसा, काय ते अधिकारी, एकदम ओकेच!! आयकरच्या छाप्यात इतका पैसा की रक्कम मोजायला लागले तब्बल १४ तास..
एकाच पिकात चार पिके, नवीन तंत्रज्ञानामुळे मिळणार बक्कळ पैसा..
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! लंम्पी त्वचेच्या रोगावर लस आली
Share your comments