वीज बिलाच्या संदर्भात वाढीव वीज बिलाचे समस्या कायमच असते. नागरिकांच्या कायम याबाबत तक्रारी असतात. यामागे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे मिटर रिडींग घेताना ते सदोष पद्धतीने घेणे होय.
त्यामुळे महावितरणने गेले फेब्रुवारीपासून लघुदाब वर्गवारीतील सुमारे 2 कोटी 15 लाख ग्राहकांना वीज वापरा प्रमाणे अचूक मीटर रेडींग चे बिल देण्यासाठी विविध उपाययोजना सुरुवात केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रीडिंग घेताना अचूकपणे न करणे
किंवा हेतुपुरस्कर चुका करणे आढळून आल्यामुळे राज्यातील जवळजवळ 47 मीटर रीडिंग एजन्सीला बडतर्फ करण्यात आले आहे. यातील आठ एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या 47 एजन्सी मध्ये मराठवाड्यातील 16 एजन्सीचा समावेश आहे.
ही कारवाई केल्यानंतर मागच्या महिन्यात तक्रारींचे प्रमाण देखील घटले असून वीज विक्रीत 199 दशलक्ष युनिटने म्हणजे 140 कोटी रुपयांनी महसुलात वाढ झाल्याची नोंद महावितरणने केली आहे.
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनीएजन्सी संचालक तसेच लेखा अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आढावाबैठक घेऊन निर्णय घेतला.
मीटर च्या रीडिंगचे फोटोच्या व्हेरिफायसाठी स्वतंत्र कक्ष
फेब्रुवारी पासून याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली होती. राज्यातील जवळजवळ लघुदाब ग्राहक असलेल्या दोन कोटी 15 लाख मीटरचे रीडिंग कंत्राटी पद्धतीच्या एजन्सीच्या माध्यमातून करण्यात येते. या एजन्सिज नी काढलेल्या मिटर रिडींग या फोटोची खातरजमा व वेरिफिकेशन करण्यासाठी मुख्यालयात एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या कक्षाने पडताळणी मध्ये मीटर रीडिंगचे फोटो अस्पष्ट असणे, तसेच रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे इत्यादी प्रकार आढळून आले आहेत त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
Share your comments