Maharashtra Government : माझे पती (धनंजय मुंडे) हे सरकार देव आला तरी पडू शकत नाही असं म्हणायचे. पण एका महिलेच्या शापाने महाविकास आघाडी सरकार पडले. आता जे सरकार यायचं स्वप्न पाहात आहेत ते आता कधीही येणार नाही," असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलताना करुणा मुंडे यांनी हे विधान केले आहे.
करुणा मुंडे यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याबाबत बोलताना करुणा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
"चुकीची कारवाई अनेकांवर झाली. माझ्या गाडीमध्ये तर पिस्तूल ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी कोणत्याही महिला नेत्यांनी याबाबत भाष्य केले नाही. आता आणखी लोकांवर कारवाई होणार आहे. 165 आमदारांचे सरकार पहिल्यांदा पडले.
शरद पवार अत्यंत भावूक..! काय घडलं असं... जाणून घ्या
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल कोश्यारींचे वादग्रस्त विधान; पुन्हा वाद पेटण्याची शक्यता..
माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पत्नी करुणा मुंडे या नेहमी चर्चेत असतात. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेकदा आरोप केलेत. काही महिन्यांपूर्वी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. या आरोपांनंतर राज्यातील राजकारण बरंच तापलेलं होतं.
खुशखबर! जुन्या पेन्शन स्कीम पुन्हा सुरु; सरकारचा मोठा निर्णय
यानंतर करुणा मुंडे यांनी स्वतःच्या पक्षाची स्थापन केली. राज्यातील राजकीय घडामोडींवरही करुणा मुंडे नेहमीच व्यक्त होत असतात. राज्यातील सत्तातरांबाबत बोलताना करुणा मुंडे यांनी आपल्या शापामुळे हे सरकार पडलं असे म्हटले आहे.
शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, 26 नोव्हेंबरला सरकार विरोधात राज्यभर आंदोलन
Share your comments