यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे अनेकांची पिके वाया गेली. यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती. मात्र अजूनही ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही.
असे असताना आता पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतीसाठी मुबकल प्रमाणावर पाणी उपलब्ध आहे. मात्र शेतकऱ्यांवर संकट आले आहे. सध्या शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
महावितरणच्या लातूर परिमंडळातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ४९२ शेतकऱ्यांकडे ५ हजार ८७९ कोटी ३७ लाखांची थकबाकी आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने रब्बी हंगामासाठी विजेची मागणी वाढणार आहे. यामुळे विज बिलाची वसुली होणे आवश्यक आहे.
सफरचंदापेक्षाही महाग सीताफळ, डझनचा दर 400 रुपयांवर..
दरम्यान, लातूर (Latur) परिमंडळात ११ हजार ६६६ कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकित बिलासाठी विशेष मोहीम सुरू आहे. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास सरकारच्या काळात देखील अशाच प्रकारे वीज वसुली केली जात होती. आता देखील हाच प्रकार सुरू आहे. आता ज्या कृषिपंपधारकांकडे थकबाकी आहे. त्यांनी भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
काय सांगता! गायींना गाणी ऐकवली तर ५ लिटर दूध जास्त देतात, तरुणाने केले सिद्ध
दरम्यान, कृषिपंपांना वर्षातून तीन बिले दिली जातात. यामध्ये एकही बिल न भरल्याने थकबाकी वाढली आहे. यामुळे आता यावर काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे मात्र पिके जळून जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो आता इनवेल बोअरिंग साठी मिळणार २० हजार रुपये
शेतकऱ्यांनो देशी गाईच्या शेणापासून तयार करा पणत्या, लाखोंमध्ये होतेय कमाई, जाणून घ्या..
काय बोलता! हा चहा मिळतोय ९ कोटी रुपयांत एक किलो, वाचा काय आहे खासियत..
Share your comments