1. बातम्या

कृषीच्या पायाभूत सुविधेसाठी महाराष्ट्राला मिळणार ८ हजार कोटी

KJ Staff
KJ Staff

पुणे : केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अत्यंत महत्वकांक्षी १ लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत महाराष्ट्र राज्याला अंदाजे ८,४६० कोटी रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या मार्गदर्शक प्रणालीअंतर्गत ही माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे राज्यतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात सरकारने या निधीला मान्यता दिली आहे. ही योजना ४ वर्षांसाठी असेल. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या वर्षी १० हजार कोटी उपलब्ध होणार आहे. नंतरच्या तीन वर्षाच्या काळात प्रयेक वर्षी ३० हजार कोटी उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत सर्वात जास्त १२८३१ कोटी उत्तर प्रदेशला मिळाले आहेत. त्या खालोखाल राजस्थान ( ९०१५ कोटी), गुजरात ( ७२५२ कोटी) हि राज्ये आहेत. या योजनेअंतर्गत काढणीअंतर्गत येणारे कमी, काढणीपश्चात कामे यांना या गोष्टींसाठी कर्जे मिळणार आहेत.

या निधीअंतर्गत गावपातळीवरील पत सोसायट्या, पणन सोसायट्या, कृषी उत्पादक कंपन्या, बचत गट, शेतकरी, बुउद्देशीय संस्था, स्टार्ट अप, कृषी उदयोजक, केंद्र आणि राज्य सरकाने पुरस्कृत केलेले खाजगी प्रकल्पांना मदत होणार आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters