महाराष्ट्राला दुष्काळ निवारणासाठी 4 हजार 714 कोटी

Wednesday, 30 January 2019 07:49 AM


नवी दिल्ली:
केंद्र शासनाने आज महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी 4 हजार 714 कोटी 28 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत आज ही मंजुरी देण्यात आली आहे. या समितीने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्रासह देशातील नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेले 6 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी एकूण 7 हजार 214 कोटी 3 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

मागील वर्षी महाराष्ट्रात आलेल्या गंभीर दुष्काळाच्या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी राज्याने केंद्र शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी राज्याने सादर केलेला मदत निधी प्रस्ताव लवकर मंजूर करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून आज राज्याला 4 हजार 714 कोटी 28 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल, कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्यासह गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय, कृषी मंत्रालय व नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

drought राजनाथ सिंह Rajnath Singh दुष्काळ राधा मोहन सिंह Radha Mohan Singh Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस
English Summary: Maharashtra 4 thousand 714 crore for the drought relief help

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.