चिखली तालुक्यातील बिजोत्पादक शेतकऱ्यांसाठी महाबीजने बियाणे कोटा वाढवून द्यावा

07 June 2021 06:02 PM By: भरत भास्कर जाधव
महाबीज

महाबीज

चिखली- शेतकरी शेती मशागतीच्या कामास लागला असून बियाणे, खतासाठी शेतकरी धावपळ करतांना दिसत आहे. शेतकऱ्यांनी महाबीजकडे सोयाबीन बियाणेसाठी नोंदणी केली आहे. परंतु चिखली तालुक्यात मागणीच्या ५०% बियाणेच मिळणार असल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे.

तर चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे पायाभूत व प्रमाणीत बियाणे कोटा वाढवण्यात यावा,अशी मागणी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य तथा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे १जुन २०२१रोजी केली आहे.

चिखली तालुका हा राज्यात सोयाबीन उत्पादनाच्या क्षेत्रात अग्रेसर असुन चिखली येथे सर्वात मोठा बियाणे प्रकल्प सुद्धा आहे.तालुक्यातील शेतकर्यानी महाबिज केंद्रावर बियाण्याची यापुर्वीच नोंदणी केली आहे.त्या दृष्टिने शेतकर्यानी पेरणीचे नियोजन सुद्धा केले आहे.परंतु जिल्ह्यात ५४%शेतकर्यानाच महाबिजकडुन बियाणे मिळू शकते असी माहिती मिळाल्याने व चिखली महाबीज केंद्रावर शेतकरी गेले असता तालुक्यासाठी मागणीच्या ५०%च बियाणे मिळेल असे सांगितले जात असल्याने पेरणीच्या नियोजनात असलेल्या शेतकऱ्यांना महाबीज कडून मागणी नुसारबियाणे मिळणार नसल्याने व कृषी केंद्रावरही महाबिजचे प्रमाणित बियाणे साठा कमी असल्याने शेतकऱ्यांपुढे अचानकपणे बियाण्याचे संकट उभे राहले आहे.

 

पायाभूत बियाणे शेजारी दुसरे कोणतेही बियाणे पेरणी करता येत नाही.असे असतांना मागणी प्रमाणे बियाणे मिळणार नसल्याने यामुळे उर्वरीत क्षेत्र पडीत ठेवायचे का?असे प्रश्न अल्पभुधारक शेतकरी उपस्थीत करीत आहेत. तर शेतकरी बियाणेसाठी महाबिज वर गर्दि करीत आहे. तालुक्यात बियाणे कमी प्रमाणात उत्पादन झाल्यास या प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परीणाम होवू शकतो व भविष्यात यापेक्षा मोठा सोयाबीन बियाणे तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकर्यासाठी सरसावली असून चिखली तालुक्यातील शेतकर्यासाठी सोयाबीनचे पायाभुत बियाणे कोटा ५०%पेक्षा जास्त वाढवूण देण्यात यावा

महाबीजकडून प्रमाणे बियाणे उपलब्ध करुण देण्यात यावे व शेतकर्याच्या समस्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी महाबिजचे व्यवस्थापकीय संचालक,पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे,जिल्हाधिकारी व महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.सदर मागण्यांची पुर्तता न झाल्यास शेतकर्याच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा सज्जड इशारा देखील पत्रात देण्यात आला आहे.

बियाण्यांसाठी शेतकर्याची चिखली महाबिज केंद्रावर गर्दी

ऐन वेळेवर मागणीच्या 50% च बियाने देण्याचे महाबिजने जाहीर केल्याने व इतरत्रही बियाणे मिळत नसल्याने शेतकर्यानी चिखली महाबिज केंद्रावर गर्दि केली होती.
प्रतीनिधी-गोपाल उगले

Mahabeej seed farmers बिजोत्पादक महाबीज
English Summary: Mahabeej should increase the seed quota for seed farmers in Chikhali taluka

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.