MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

LPG Price : घरगुती एलपीजी गॅस पुन्हा महागला; सर्वसामान्यांचे बजट पुन्हा कोलमडलं

महागाईने हैराण झालेली सर्वसामान्य जनतेला पुन्हा महागाईचा दणका बसणार आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा पुन्हा एकदा वाढला आहे. मदर्स डेच्या आदल्या दिवशी पुन्हा लोकांना मोठा झटका बसला आहे. मित्रांनो भारतीय तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात वाढ केली आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
lpg price hike

lpg price hike

महागाईने हैराण झालेली सर्वसामान्य जनतेला पुन्हा महागाईचा दणका बसणार आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा पुन्हा एकदा वाढला आहे. मदर्स डेच्या आदल्या दिवशी पुन्हा लोकांना मोठा झटका बसला आहे. मित्रांनो भारतीय तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात वाढ केली आहे.

यापूर्वी व्यावसायिक अर्थात कमर्शियल एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्याची बातमी समोर आली होती. आणि आता हाती आलेल्या माहितीनुसार, आज घरगुती एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्याचे उघड झाले आहे. आज शनिवारी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (14.2 किलो) किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत देशातील बहुतांश भागात 999.50 रुपयांवर गेली आहे. वाढीव किंमत आज 7 मे 2022 पासून लागू केली जाणार असल्याचे सांगितले जातं आहे.

महत्वाच्या बातम्या:

Health News : रात्री हे पदार्थ चुकूनही खाऊ नका; नाहीतर आरोग्य येणार धोक्यात

Business Idea 2022 : घरातच सुरु करा हा बिजनेस आणि कमवा लाखों; वाचा याविषयी

तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती LPG (14.2 kg) सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ केल्याने मध्यमवर्गीय कुटुंबाचे बजेट कोलमडणार असून खिशाला मोठी कात्री बसणार आहे. नवीन किंमती वाढल्यानंतर आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपये एवढी झाली आहे.

राजधानी मुंबईत 999.50 रुपये प्रति सिलेंडर एवढी किंमत झाली असून कोलकातामध्ये 1026 रुपये प्रति सिलेंडर, चेन्नईमध्ये 1015.50 रुपये आणि नोएडामध्ये 997.50 रुपये प्रति सिलेंडर एवढी किंमत आता झाली आहे.

मातृदिनापूर्वीच गृहिणींना झटका बसला असल्याचे सांगितले जातं आहे. या निर्णयामुळे सरकार आणि तेल कंपन्यांनी देशातील तमाम मातांना मोठा धक्का दिला असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. मंदीमुळे महागाई वाढत असल्याचे सांगितले जातं आहे.

गेल्या तीन महिन्यांत एलपीजीच्या किमतीत वाढ होण्याची ही तिसरी वेळ आहे.  याआधी 1 मे रोजी अर्थात कामगार दिनी तसेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीत 102 रुपये 50 पैशांनी वाढ केली होती. त्यावेळी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ केली गेली होती किंमती वाढल्यानंतर व्यवसायिक सिलिंडरची एकूण किंमत 2355.50 रुपये एवढी झाली आहे.

English Summary: LPG Price: Domestic LPG price rises again; The general budget collapsed again Published on: 07 May 2022, 02:07 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters