1. बातम्या

सर्वसामान्यांना आणखी एक मोठा धक्का, एलपीजी सिलिंडर महागला, नवीन किंमती जाणून घ्या

KJ Maharashtra
KJ Maharashtra
lpg cylinder

lpg cylinder

एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत पुन्हा एकदा वाढली आहे. पुन्हा एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली. तीन दिवसांपूर्वीच या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती.14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडरसाठी 25 रुपये द्यावे लागतील. या किंमती आजपासून लागू होतील. यासह किंमती वाढल्यानंतर आता दिल्लीत घरगुती गॅसचा दर 794 वरुन 819 रुपयांवर आला आहे.

वाढत्या महागाई दरम्यान सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीची किंमत वाढली आहे. सोमवारी पुन्हा एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली. आठवड्यातून दोनदा एलपीजी सिलिंडरची किंमत वाढली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये 4 रोजी 25 रुपयांची वाढ झाली होती, 14 रोजी 50 रुपयांची वाढ झाली होती.

हेही वाचा:स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे महिन्याला दहा हजार रुपये कमावण्याची संधी

फेब्रुवारीमध्ये एलपीजीच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली. गेल्या एका महिन्यात चौथ्यांदा किंमत वाढली आहे आणि आतापर्यंत 125 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वीच या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात यात 50 रुपयांनी दुप्पट वाढ करण्यात आली. म्हणजेच आतापर्यंत एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सुमारे 225 रुपयांनी वाढ झाली आहे.

या चार महानगरांमध्ये नवीनतम दर काय आहे ते जाणून घ्या:

दिल्लीत 819 रुपयांची नवीन किंमत,मुंबईत 819 रुपये,कोलकता मध्ये 845.50 रुपये,चेन्नईमध्ये 835 रुपये झाले आहे.2021साल चा बजेट जेव्हापासून आला आहे त्यावेळीपासून इंधनाची किंमत गगनाला भिडली आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters